किडनी खराब होण्याचे प्रमुख कारण ठरु शकते 'मधुमेह'

मधुमेहामुळे तुमच्या किडनीला हळूहळू नुकसान होते आणि सुरुवातीला त्याचे धोक्याचे चिन्ह ओळखणे कठीण जाते.
Diabetes can cause damage to your kidneys
Diabetes can cause damage to your kidneysDainikGomantak
Published on
Updated on

जर तुम्हाला दीर्घ काळापासून मधुमेहाचा त्रास होत असेल आणि रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करता येत नसेल, तर तुमच्या किडनीला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. मधुमेहामुळे तुमच्या किडनीला हळूहळू नुकसान होते आणि सुरुवातीला त्याचे धोक्याचे चिन्ह ओळखणे कठीण जाते. जेव्हा रक्तातील साखर बराच काळ रक्तप्रवाहात राहते, तेव्हा ते तुमच्या मूत्रपिंडातील रक्तवाहिन्यांना हळूहळू नुकसान करतात. (Diabetes can cause damage to your kidneys)

Diabetes can cause damage to your kidneys
Recipe: चवदार आणि झटपट तयार होणारा पदार्थ 'Crispy Paneer Balls'

मधुमेहामुळे (Diabetes) किडनी खराब होण्याची अनेक कारणे आहेत. दुर्दैवाने, मधुमेहाच्या मूत्रपिंडाच्या आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात, कोणतीही लक्षणे दिसत नाहीत आणि केवळ नियमित तपासणीमुळेच कोणतीही समस्या शोधण्यात मदत होते. मधुमेहामध्ये अनेक यंत्रणा आहेत ज्या किडनीला (kidney) हानी पोहोचवतात. त्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो आणि किडनी हळूहळू खराब होऊ लागते. यासोबतच लघवीमध्ये प्रोटीनची कमतरता असते. त्यामुळे युरिन इन्फेक्शनचा धोकाही वाढतो. डॉक्टरांच्या (Doctor) म्हणण्यानुसार, लघवीमध्ये साखरेची उच्च पातळी देखील बॅक्टेरियांना वेगाने वाढू देते, ज्यामुळे वारंवार मूत्रमार्गात संक्रमण (यूटीआय) होते जे किडनीला हानी पोहोचवण्यास मदत करतात.

Diabetes can cause damage to your kidneys
Recipe: चवदार आणि झटपट तयार होणारा पदार्थ 'Crispy Paneer Balls'

डायबेटिक किडनीच्या आजाराचे प्राथमिक अवस्थेत निदान कसे करावे

"लघवी-अल्ब्युमिन क्रिएटिनिन रेशो (U-ACR) नावाची एक साधी लघवी चाचणी लघवीमध्ये प्रथिने (अल्ब्युमिन) ची उपस्थिती शोधू शकते. ग्लोमेरुलर फिल्टरेशन रेट (eGFR) चाचणी किडनीची टाकाऊ पदार्थ फिल्टर करण्याची क्षमता निर्धारित करते.

मधुमेह किडनी रोगाच्या नंतरच्या टप्प्यातील लक्षणे

रोग जसजसा वाढत जातो तसतसे लक्षणे दिसतात. एखाद्या व्यक्तीच्या पाया आणि हाता सूज येवु शकते, फेसयुक्त लघवी आणि थकवा असू शकतो. तज्ज्ञांच्या मते, नंतरच्या टप्प्यात, घोट्याला, पायांना आणि हातांना सूज येणे, फेसयुक्त लघवी (अल्ब्युमिनच्या उपस्थितीमुळे), लघवीत रक्त येणे, धाप लागणे, मळमळणे, सतत थकवा जाणवणे ही लक्षणे जाणवू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com