Dhanteras 2023 Recipe: दिवाळी हा दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. हिंदू धर्मात या सणाला खुप महत्व आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण दिवाळीची आतुरतेने वाट पाहत असतात.
दिवाळीचा सण पाच दिवस चालतो. पहिल्या दिवशी धनत्रयोदशी, दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी, तिसऱ्या दिवशी दिवाळी, चौथ्या दिवशी गोवर्धन पूजा आणि पाचव्या दिवशी भावबीज साजरा केला जातो.
धनत्रयोदशीच्या दिवशी दीपोत्सवाचा पहिला सण, भगवान धन्वंतरी, भगवान गणेश, माता लक्ष्मी आणि कुबेर महाराज यांची पूजा केली जाते. हा दिवस खरेदीसाठी अतिशय योग्य मानला जातो.
धनत्रयोदशीच्या दिवशी देवाला विशेष नैवेद्य देण्याची परंपरा आहे. बाहेरून पदार्थ आणल्यापेक्षा तुम्ही घरीच मोतीचूर लाडू बनवू शकता. ते बनवणे खूप सोपे आहे. चला तर मग जाणून घेऊया मोतीचूर लाडू कसे बनवले जातात.
2 कप बेसन
1 टीस्पून हिरवी विलायची
1/2 टीस्पून फूड कलर
1 चिमूटभर बेकिंग सोडा
3 कप साखर
4 कप पाणी
1 लिटर दूध
6 कप तूप
जर तुम्ही घरी मोतीचूर लाडू बनवण्याचा विचार करत असाल तर आधी पाक तयार करावा. पाक तयार करण्यासाठी पॅनमध्ये पाणी गरम करावे. पाणी गरम झाल्यावर त्यात साखर घालावी. थोड्या-थोड्या वेळाने पाणी ढवळत राहावे, म्हणजे साखर विरघळेल. साखर व्यवस्थित विरघळली की त्यात थोडे दूध घालावे.
दूध घातल्यानंतर साखरेच्यापाकमध्ये फेस येण्यास सुरवात होईल, ते सतत काढत रहावे. यानंतर पाक घट्ट झाल्यावर त्यात चवीनुसार विलायची पावडर आणि केशर टाकावे.
यानंतर एका मोठ्या भांड्यात बेसन आणि दूध घेऊन चांगले मिक्स करावे. त्यात थोडा बेकिंग सोडा घालावा. पीठ तयार झाल्यावर कढईत तेल गरम करून बुंदी गाळून घ्यावी.
बुंदी व्यवस्थित गाळून झाल्यावर बाहेर काढावी. आता पाकमध्ये बुंदी घालावी आणि थोडा वेळ तसेच ठेवावे. काही वेळाने पाकातून काढून छोटे लाडू तयार करावे. त्यावर तुम्ही पिस्ता आणि सिल्व्हर वर्कने सजवू शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.