Dengue Shock Syndrome: काय आहे डेंग्यू शॉक सिंड्रोम? कसा बनतो मृत्यूचं कारण? दुर्लक्ष करणं पडू शकत महागात; जाणून घ्या लक्षणे आणि बचावात्मक उपाय

Dengue Shock Syndrome Prevention Tips : जेव्हा डेंग्यूचा विषाणू रक्ताच्या वाहिन्या (Blood Vessels) कमकुवत करतो, तेव्हा रुग्णाचा रक्तदाब अचानक कमी होतो.
Dengue Shock Syndrome Prevention Tips
Dengue Shock SyndromeDainik Gomantak
Published on
Updated on

Dengue Shock Syndrome: सध्या ऑक्टोबर महिना सुरु असताना अनेक राज्यांमध्ये डेंग्यूच्या (Dengue) रुग्णांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या रुग्णसंख्येदरम्यान डेंग्यूमुळे झालेल्या मृत्यूची एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नोएडा प्राधिकरणचे डीजीएम (DGM) आशिष भाटी यांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. डेंग्यूची ही समस्या बहुतांश रुग्णांमध्ये काही दिवसांत बरी होते, पण काही प्रकरणांमध्ये ती गंभीर आणि जीवघेणी ठरु शकते. डेंग्यूची कोणती लक्षणे धोकादायक ठरतात आणि 'शॉक सिंड्रोम' (Shock Syndrome) पासून बचाव कसा करावा, याबद्दल तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

डेंग्यू शॉक सिंड्रोम: मृत्यूचे मुख्य कारण

दिल्ली एमसीडीतील डॉ. अजय कुमार यांच्या मते, डेंग्यू प्रत्येक व्यक्तीसाठी धोकादायक नसतो. 90 टक्के लोकांमध्ये सौम्य लक्षणे दिसतात आणि ते लवकर बरेही होतात. मात्र, काही रुग्णांना डेंग्यू शॉक सिंड्रोम होतो, जो मृत्यूचे कारण बनू शकतो. हा डेंग्यूचा सर्वात गंभीर प्रकार आहे. प्लेटलेट्सची संख्या 20 हजारांपेक्षा कमी होणे धोकादायक मानले जाते, पण शॉक सिंड्रोम त्याहूनही जास्त जीवघेणा ठरतो. चला तर मग हा शॉक सिंड्रोम आहे तरी काय याबाबत जाणून घेऊया...

शॉक सिंड्रोम का होतो?

जेव्हा डेंग्यूचा विषाणू रक्ताच्या वाहिन्या (Blood Vessels) कमकुवत करतो, तेव्हा रुग्णाचा रक्तदाब अचानक कमी होतो. यामुळे शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांना (Organs) होणारा रक्ताचा पुरवठा थांबतो. शॉक सिंड्रोममुळे अनेक अवयव निकामी (Multiple Organ Failure) होतात, ज्यामुळे रुग्णाचा मृत्यू होतो.

Dengue Shock Syndrome Prevention Tips
Goa Dengue Cases: मडगावात डेंग्यूचे तुरळक प्रमाणात रुग्ण! तातडीने उपाययोजना केल्याचा परिणाम

शॉक सिंड्रोमची सुरुवात अचानक होत नाही

डॉ. अजय सांगतात की, डेंग्यू शॉक सिंड्रोम अचानक येत नाही. अनेक रुग्ण सुरुवातीला येणाऱ्या हलक्या तापाकडे दुर्लक्ष करतात आणि तपासणी करत नाहीत.

  • ताप तीन ते चार दिवसांपर्यंत वाढू शकतो.

  • यादरम्यान अचानक अस्वस्थता, थंडपणा, पोटदुखी, उलट्या आणि तीव्र अशक्तपणा जाणवतो, ही शॉक सिंड्रोमच्या सुरुवातीची लक्षणे आहेत.

  • या टप्प्यावर उपचार न मिळाल्यास रक्तदाब झपाट्याने कमी होतो आणि नाक किंवा हिरड्यांमधून रक्तस्त्राव सुरु होऊ शकतो.

Dengue Shock Syndrome Prevention Tips
Heart Health: स्क्रिनच्या अतिवापरामुळे वाढतोय हृदयविकाराचा धोका! वाचा काय आहे डिजिटल युगातील 'Heart Attack'

उपचार आणि बचावाचे उपाय

  1. तपासणी करा: या वातावरणात सलग तीन दिवस ताप असल्यास त्वरित डेंग्यू आणि सीबीसी (CBC) चाचणी करा.

  2. पाणी आणि मॉनिटरिंग: शरीरात पाण्याची कमतरता (Dehydration) होऊ देऊ नका आणि दिवसातून किमान आठ ग्लास पाणी प्या. रक्तदाब आणि प्लेटलेट्सची संख्या सतत तपासा.

  3. पेनकिलर्स टाळा: डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही पेनकिलर किंवा ॲस्पिरिन (Aspirin) घेऊ नका.

  4. बचाव: घरात आणि आसपास पाणी साचू देऊ नका. शक्यतो मच्छरदाणीचा वापर करा आणि पूर्ण बाहीचे कपडे घाला.

  5. वेळेत उपचार: डेंग्यूची सुरुवातीची लक्षणे दिसताच घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com