Heel Pain Remedies: 'या' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होतो टाचदुखीचा त्रास!

टाच दुखणे हे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे शरीराचे संतुलन आणि स्नायूंमध्ये अडथळा येऊ शकतो.
Heel Pain Remedies
Heel Pain RemediesDainik Gomantak
Published on
Updated on

Heel Pain Remedies: टाच हा संपूर्ण पायाचा महत्वाचा भाग आहे जो सर्वात जास्त दुखतो. अनेकांना याचा त्रास सहन करावा लागतो. टाच दुखण्याचे कारण माहित असणे गरजेचे आहे. त्यावर उपाय करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.

टाच दुखणे हे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे शरीराचे संतुलन आणि स्नायूंमध्ये अडथळा येऊ शकतो. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे आणि टाचांमध्ये तीव्र वेदना होतात.

Heel Pain Remedies
Bra Care Tips: कप असलेली ब्रा धुताना कोणती काळजी घ्यावी

व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी3 मुळे टाचांमध्ये तीव्र वेदना होतात. व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी 3 च्या कमतरतेमुळे टाचदुखी होते. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे शरीरात कॅल्शियम तयार होत नाही आणि व्हिटॅमिन बी 3 च्या कमतरतेमुळे टाचांना तडे जाऊ लागतात.

टाचदुखीची कारणे

प्लांटर फॅसिटायटिस

टाचदुखीचे एक सामान्य कारण म्हणजे प्लांटार फॅसिटायटिस. यामध्ये ऊती आणि स्नायूंमध्ये खूप वेदना सुरू होतात.

संधिवात

संधिवातामुळे देखील टाच दुखू शकते. वास्तविक, सांधेदुखीमध्ये टाचांच्या उशीवर परिणाम होतो. वैद्यकीय भाषेत त्याला टेंडिनाइटिस म्हणतात. यामध्ये, सकाळी उठल्याबरोबर टाचांमध्ये तीव्र वेदना सुरू होतात.

आपण घरगुती उपायांच्या मदतीने ते बरे करू शकता. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा आहार सुधारावा लागेल. तसेच कोमट पाण्यात मीठ घाला आणि काही मिनिटे पाय ठेवा. तुम्ही आणखी एक गोष्ट करू शकता. मोहरीच्या तेलात लसूण टाका, नीट शिजवा आणि दुखत असलेल्या टाचांना मसाज करा, यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com