Dating Tips
Dating TipsDainik Gomantak

Dating Tips: पुरूषांनी पहिल्या डेटमध्ये 'या' गोष्टींची घ्या काळजी

कोणासोबत फर्स्ट डेटला जाताना मनात अनेक प्रकारचे प्रश्न, संभ्रम आणि थोडीशी चिंताही असते.
Published on

कोणासोबत फर्स्ट डेटला जाताना मनात अनेक प्रकारचा गोंधळ, अनेक प्रकारचे प्रश्न आणि थोडी चिंताही असते. डेटला काय होणार? मी तिला आवडेल की नाही ? या सारखे अनेक प्रश्न मनात घोळत असतात. त्याचबरोबर पहिल्या डेटला जाण्याआधी, उत्साहात किंवा अस्वस्थतेच्या भरात जाणून-बुजून छोट्या-छोट्या चुका होतात, ज्या अनेकवेळा नातेसंबंध बनण्याआधीच बिघडण्याचे कारण बनतात. चला तर मग जाणुन घेऊया डेटाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी. (Dating Tips for men News)

बळजबरी करू नका -

जर तुम्ही पहिल्यांदा डेटवर जात असाल, तर जोडीदाराच्या सोयीची नक्कीच काळजी घ्या. तुम्ही ज्या ठिकाणी जात आहात, प्रथम तुमच्या जोडीदाराला विचारा, जेणेकरून त्यांला तिथे जाताना त्रास होणार नाही. याशिवाय खाणे-पिणे किंवा कशासाठीही जबरदस्ती करू नका.

मैत्रीपासुन करावी सुरूवात -

तुम्हाला आवडणारी व्यक्ती आधीच तुमची मैत्रीण असेल तर तुमच्या भावनांसमोर ती मैत्री विसरू नका. याशिवाय जर तुमची एकमेकांना ओळख व्हायला लागली असेल तर थेट प्रपोज करू नका, आधी मैत्रीचा हात पुढे करा.

अस्वस्थता -

पहिल्यांदाच डेटवर जाताना, अस्वस्थता आणि संकोच मध्ये असे काहीही बोलू नका, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला अस्वस्थ वाटेल. घाई करण्याऐवजी आपल्या भावना त्यांच्यासमोर आरामात मांडा.

Dating Tips
Cosmetics Tips: 'या' 4 ट्रिक वापरून ओळखा बनावट काॅस्मेटिक्स

प्रपोज करताना -

पहिल्या डेटला जाण्यापूर्वी तुम्ही एकमेकांच्या भावना समजून घेत असाल तरच प्रपोज करण्याचा निर्णय घ्या. तुम्ही प्रपोज करत असाल तर तुमच्या पार्टनरला आवडेल आणि प्रपोजल स्वीकारेल असे काहीतरी करा. असे झाले नाही तरी तुम्ही त्यांना थोडा वेळ द्या आणि वाद घालू नका किंवा जबरदस्ती करू नका.

दिखाऊ करू नका -

फक्त तुमच्या जोडीदारासमोर बोला, जे तुम्ही अंमलात आणू शकता. अनेक लोक त्यांच्या पहिल्या डेटवर समोरच्या व्यक्तीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतात. असे करणे टाळा.

तुमच्या जोडीदाराचा आदर करा -

जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत पहिल्या डेटवर जात असाल, तेव्हा तुम्हाला त्यांचा आदर करावा. कधी कधी छोट्या-छोट्या गोष्टींमुळेही समोरच्या व्यक्तीला आपण हॉटेलमध्ये असल्यासारखे खास वाटू शकते, म्हणून स्वत: बसून, आपण त्यांच्यासाठी खुर्ची ओढू शकता. त्यांच्या आवडी-निवडी जाणून घ्या आणि त्यांचा आदर करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com