भाव..राग..ताल..नाट्य: भरतनाट्यम

नृत्य हा एका प्रकारचा व्यायामही आहे ज्यामुळे शारिरीक, मानसिक सुदृढता लाभते.
International Dance Day 2022
International Dance Day 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

29 एप्रिल हा जागतिक नृत्य दिन (International Dance Day) म्हणुन जगभरात साजरा केला जातो. बॅले नृत्याचे जनक फ्रांसचे जीन जॉर्ज नोवेर्र यांचा 29 एप्रिल हा जन्मदिवस. म्हणुन हा दिवस1982 पासून जागतिक नृत्य दिन म्हणुन साजरा होतो. नृत्याचा प्रसार व्हावा व नृत्य शिक्षणाची केंद्रे जगभरात पसरावी या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

मूळ अहमाद, गुजरात येथील गौरव व्यास यांनी आपले नृत्याचे शिक्षण मुंबईत पूर्ण करून 2014 साली थेट मडगाव, गोवा (Goa) गाठले व श्री दामोदर विद्याप्रसारक मंडळाच्या श्री दामोदर संगीत शाळेत त्यानी नृत्य शिकवायला सुरुवात केली. गेल्या 8 वर्षांत त्यानी अंदाजे 700 ते 800 मुलांना नृत्याचे धडे दिले आहेत. सध्या त्यांच्या हाताखाली 60 मुले नृत्याचे शिक्षण घेत आहेत. श्री दामोदर संगीत विद्यालय हे अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाकडे संलग्न आहे व दरवर्षी विद्यार्थी महाविद्यालयाच्या परीक्षांना बसतात. श्री दामोदर विद्या भुवन हे महाविद्यालयाचे गोव्यातील एक परीक्षेचे केंद्र करण्यात व्यास यानी पुढाकार घेतला होता. त्यांच्या 5 विद्यार्थ्यांनी विशारद ही उच्चश्रेणीय परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

भारतात नृत्यपरंपरा ही मंदिर परंपरेपासून सुरू झाली. भारतातील शास्त्रीय नृत्य हे भारतमुनीच्या नाट्यशास्त्रावर व नंदकिशोर यांच्या अभिनय दर्पण शास्त्रांवर आधारीत आहे. भारतात राजा महाराजांनी नृत्याला चांगले उत्तेजन दिले होते. नंतर ब्रिटीश काळात नृत्याचे महत्व कमी झाले तरी काहीनी आपली परंपरा जपली व नृत्याला मानाचे व प्रतिष्ठेचे स्थान मिळवून दिले.

नृत्य (Dance) हा एका प्रकारचा व्यायामही आहे ज्यामुळे शारिरीक, मानसिक सुदृढता लाभते. पौराणिक कथेवरील नृत्यातुन भारताच्या पुराणकाळाचीही ओळख होते तसेच संस्कृत भाषेचाही अभ्यास होत जातो. सद्याच्या परिस्थिती देशासह परदेशातही नृत्याचे व्यापारीकरण चालू आहे त्यामुळे नृत्य प्रकारात व सादरीकरणात जमीन अस्मानाचा फरक दिसतो असेही व्यास म्हणाले. ‘यात गैर काहीच नाही. नृत्य शिकल्याने युवकांसाठी अनेक व्यवसायाचे, उदरनिर्वाहाचे स्त्रोत खुले झाले आहेत. नृत्य शिकून व्यक्ती एक उत्तम नृत्य शिक्षक बनू शकतो, नटोंगममध्ये तो नृत्य करणाऱ्याला साथ देऊ शकतो. सिनेमा, टीव्ही मालिकां किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तो कोरिओग्राफर म्हणून काम करू शकतो.;

International Dance Day 2022
Yoga Poses: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी 5 योगासने

नृत्य करताना भाव महत्वाचे असतात. भाव दाखवले नाहीत तर रसिकांना त्या नृत्यातून आनंद उपभोगता येणार नाही. भ म्हणजे भाव, र म्हणजे राग, त म्हणजे ताल व ना म्हणजे नाट्य. या सर्वांतून भरतनाट्यम बनते असेही व्यास म्हणाले. नृत्याचा प्रसार गोव्यातही झालेला आहे. अनेकजण नृत्य शिक्षणाकडे वळत आहेत. शाळा, महाविद्यालयांमध्ये नृत्याचा खास विषय असणे आवश्यक असल्याचे नृत्यगुरु व्यास यानी नमूद केले. स्वत: व्यास राज्यातील तसेच देशातील अनेक नृत्य कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.-मंगेश बोरकर

‘आमच्या भावना ज्या आम्हाला शब्दातून किंवा कृतीतून व्यक्त करता येत नाही त्या आम्ही नृत्यातून व्यक्त करू शकतो. आजच्या युगात नृत्याला साऱ्या जगात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आमच्या देशाची नृत्य परंपरा पुष्कळ जुनी आहे. ही परंपरा जपली पाहिजे, त्यासाठी युवकांना भारतीय नृत्याचा इतिहास, त्याचे फायदे शिकवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही जबाबदारी शाळांनी घेतली पाहिजे.’

नृत्यशिक्षक गुरु गौरव व्यास

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com