Daily योग: पवनमुक्तासन केल्याने पचनक्रिया सुधारते

हालचालींचा किंवा व्यायामाचा (Daily Yoga) अभावामुळे शारिरीक त्रास जास्त अधिक वाढतो.
Daily योग: पवनमुक्तासन
Daily योग: पवनमुक्तासनDainik Gomantak

सध्या अनेक क्षेत्रं अनलॉक होत असली तरी बहुतांश लोक वर्क फ्रॉम होम करत आहेत. वर्क फ्रॉम होम करताना कामाचे तासही वाढले आहेत आणि कामादरम्यान पुरेसा ब्रेकही घेता येत नाही. त्यामुळे अनेकांना मणक्याच्या, मानेच्या आणि पाठीच्या दुखण्यानं ग्रासलं आहे. तासंतास एकाच जागी चुकीच्या पद्धतीने बसणं, ब्रेक न घेता काम करणं, हालचालींचा किंवा व्यायामाचा अभाव यांमुळे हा त्रास अधिक वाढतो. अशावेळी काही योगासने ही अत्यंत फायदेशीर ठरतात. पवनमुक्तासन हे त्यापैकीच एक आसन आहे. (Daily Yoga: Pawanmuktasana improves digestion)

पवनमुक्तासन कसे करावे?

प्रथम शवासनाच्या स्थितीत या. त्यानंतर दोन्ही पाय हळूहळू गुडघ्यात दुमडून छातीजवळ आणा. दोन्ही हातांनी गुडघे धरा. या स्थितीत मान सरळ ठेवा. हे आसन प्रथम एका पायाने, नंतर दुसऱ्या पायाने आणि शेवटी दोन्ही पायांनी एकत्र केला जाऊ शकतो.

पवनमुक्तासन करण्याचे फायदे-

- कमरेचे स्नायू ताणले जातात.

- ओटीपोटाचे स्नायू बळकट होतात आणि पोटाची अतिरिक्त चरबी कमी होते.

- पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.

- पाठीचा कणा बळकट होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com