Daily योग: सुप्त ताडासन कसे करावे?

Daily योग: ताडासन हा योगासनाचाच हा एक प्रकार आहे. हे आसन जमिनीवर झोपून केले जाते,
Daily योग: ताडासन
Daily योग: ताडासनDainik Gomantak
Published on
Updated on

योगासनांतील काही आसनं ही करायला अगदी सहजसोपी असून त्यांचे शारीरिक व मानसिक फायदे अनेक आहेत. अशापैकीच एक आसन म्हणजे सुप्त ताडासन. ताडासन हा योगासनाचाच हा एक प्रकार आहे. हे आसन जमिनीवर झोपून केले जाते, म्हणून याला सुप्त ताडासन म्हणतात. हे आसन कसं करावं आणि त्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात. (Daily Yoga: How to do Supta Tadasana?)

सुप्त ताडासन कसे करावे?

चटईवर किंवा योग मॅटवर झोपावं. दोन्ही पाय ताठ ठेवावे. हातांच्या बोटांची गुंफण करत श्वासोच्छवास सुरू ठेवत दोन्ही हात हळूहळू वरच्या बाजूस न्यावेत. हे करत असतानाच पायांपासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर स्ट्रेच करावे. सुप्त ताडासनाच्या या अंतिम स्थितीत आपापल्या क्षमतेनुसार राहावे. त्यानंतर हळूहळू पूर्वस्थितीमध्ये यावे. थोड्या वेळानंतर पुन्हा या आसनाचा सराव करा. हे आसन करताना हात आणि पाय कधीही वाकवू नयेत.

सुप्त ताडासनाचे फायदे कोणते?

  • - शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी या आसनाची फार मदत होते.

  • - सुप्त ताडासन करताना संपूर्ण शरीर ताणलं जातं आणि सैल सोडलं जातं.

  • - शरीराची लवचिकता वाढते.

  • - पाठीच्या मज्जातंतूंवरील ताण कमी होण्यास मदत होते.

  • - शरीरातील ऊर्जा वाढविण्यास मदत होते.

  • - हात आणि पायांना बळकटी मिळते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com