Daily Horoscope 17 May: वैवाहिक आयुष्यासाठी खडतर काळ; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

Daily Horoscope 17 May: जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असणार
Daily Horoscope 17 May
Daily Horoscope 17 MayDainik Gomantak
Published on
Updated on
  • मेष

आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. धनाची देवाण-घेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याची वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल. तुमच्या ओळखीचे कुणतरी तुमची आर्थिक स्थिती पाहून विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देईल, त्यामुळे घरात तुम्हाला अवघडल्यासारखे वाटेल. तुम्ही प्रेम करता त्या व्यक्तीशी तुम्ही उग्रपणे वागल्यामुळे तुमच्या नातेसंबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे.  (Daily Horoscope 17 May)

  • वृषभ :

 प्रेमाच्या परमानंदात आज तुमची स्वप्ने आणि वास्तव एकच होतील. आज तुम्ही वेळ पाहून आपल्यासाठी वेळ काढू शकतात परंतु, ऑफिसच्या कुठल्या कामाच्या कारणास्तव अचानक तुम्ही असे करण्यात अयशस्वी ठराल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील खडतर काळाला तुम्हाला सामोरे जावे लागेल. (Daily Rashi Bhavishya in Marathi)

  • मिथुन :

तुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. जर आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर, विचार पूर्वक धन खर्च करा. धन हानी होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. जर तुम्ही आपल्या प्रेमी सोबत कुठे बाहेर फिरायला जात आहे तर कपडे विचार पूर्वक परिधान करा.

  • कर्क :

आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगेल दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. कुटुंबातील कुणी सदस्यांच्या आजारी पडण्यामुळे तुम्हाला आर्थिक चिंता येऊ शकते. तथापि, यावेळी तुम्हाला धन पेक्षा जास्त त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. राग हा केवळे काही काळापुरता केलेला वेडेपणा असतो, पण त्यामुळे तुम्ही संकटात सापडू शकता, याची जाणीव ठेवा.

  • सिंह :

तुमच्या प्रेमाच्या वाटेला आज एक नवे सुंदर वळण मिळणार आहे. आज तुम्हाला प्रेमाचा स्वर्गीय आनंद प्राप्त होणार आहे. नवीन उपक्रम, उद्योग हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल. या राशीतील जातक आज लोकांशी भेटण्यापेक्षा एकट्यात वेळ घालवणे अधिक पसंत करतील. 

  • कन्या :

धार्मिक आणि अध्यात्मिक हेतू पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. तुम्हाला मदतीचा हात देण्यास तुमचे नातेवाईक तयारी दर्शवतील. प्रेमात आज तुमचा सुदैवी दिवस आहे. तुम्ही इतके दिवस ज्या कल्पनाविश्वात जगत होतात, तुमचा/तुमची जोडीदार त्याचे आज प्रत्यक्ष दर्शन घडवणार आहे.

  • तुळ :

काळजी करण्याचा दिवस - तुमच्या संकल्पना अपयशी ठरणार नाहीत याची खात्री होत नाही तोपर्यत त्या कोणालाही सांगू नका. दिवस उत्तम आहे आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्म चिंतन करा. यामुळे तुमच्या व्यक्तित्वात सकारात्मक परिवर्तन येईल. तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्यासारखे वाटेल

  • वृश्चिक :

मित्राच्या थंड प्रतिसादामुळे तुम्हाला ठेच लागू शकते, पण चित्त शांत ठेवा. त्यामुळे उध्वस्त न होता आपत्ती टाळून मार्ग कसा काढता येईल याचा विचार करा. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. तुमच्या घरातील स्थितीचा काही अंशी अंदाज बांधता येणार नाही. नवीन प्रेमप्रकरण घडण्याची दाट शक्यता आहे, पण आपली खाजगी आणि गुप्त माहीती तुम्ही उघड करु नका. 

  • धनु :

आरोग्याच्या भल्यासाठी उगा त्रागा करु नका. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. कामाच्या जागी आपण स्वत:ला खूपच खेचल्यामुळे कौटुंबिक गरजा आणि आवश्यकता, अपेक्षांकडे दुर्लक्ष होऊ शकते. भूतकाळातील आनंदी क्षणांध्ये तुम्ही गुंतून जाल. नोकरी बदलणे आपल्यासाठी श्रेयस्कर आहे. 

  • मकर :

सध्याची नोकरी सोडून तुम्हाला सूट होणा-या मार्केटींग यांसारख्या क्षेत्रात काम करावे. दिवस कसा चांगला बनवला जाईल यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागेल. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. चार भिंती बाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल.

  • कुंभ :

गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, पण त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा. नोतवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. जर आपल्या लव पार्टनर ला आपला जीवनसाथी बनवण्याची इच्छा आहे तर, त्यांच्याशी आज बोलू शकतात तथापि, बोलण्याच्या आधी तुम्ही त्यांच्या भावनांना जाणून घ्या. या राशीतील व्यावसायिकांना आज व्यवसायाच्या बाबतीत काही मनाविरुद्ध यात्रा करावी लागू शकते.

  • मीन :

जे लोक पैश्याला आतापर्यंत विनाकारण खर्च करत होते आज त्यांनी आपल्यावर काबू ठेवला पाहिजे आणि धनाची बचत केली पाहिजे. एखादी जुनी ओळख तुमच्यासाठी अडचण निर्माण करु शकते. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये असाल - म्हणून तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्यासाठी खास बेत आखाल. महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com