Daily Horoscope 09 June: अति खर्च टाळा नाहीतर बायको देईल लेक्चर; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

Daily Horoscope 09 June: जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असणार
Daily Horoscope 09 June
Daily Horoscope 09 JuneDainik Gomantak
Published on
Updated on
  • मेष

आपल्या आकांक्षा आणि महत्वाकांक्षाना धक्का लागण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत मोठ्या प्रमाणात दिसून येते. ही परिस्थिती हाताळण्यासाठी योग्य सल्ल्याची आपणास गरज आहे. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. जर आपल्या लव पार्टनर ला आपला जीवनसाथी बनवण्याची इच्छा आहे तर, त्यांच्याशी आज बोलू शकता.  (Daily Horoscope 09 June)

  • वृषभ :

आज घरी बसून आराम करण्याची गरज आहे - आणि आवडते छंद जोपासा व आनंद वाटेल अशा गोष्टी करा. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. ज्येष्ठ नातेवाईक त्यांच्या समस्येवर तुम्ही उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा बाळगतील. त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील. प्रेम आणि रोमान्स तुमचा मूड आनंदी राखतील. वेळेला पैशाइतपतच असणारे महत्त्व तुम्ही जाणत असाल तर तुमच्या क्षमतेची उच्चतम पातळी गाठण्यासाठी आवश्यक ती पावले उचला. (Daily Rashi Bhavishya in Marathi)

  • मिथुन :

आपल्या आकांक्षा आणि महत्वाकांक्षाना धक्का लागण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत मोठ्या प्रमाणात दिसून येते. ही परिस्थिती हाताळण्यासाठी योग्य सल्ल्याची आपणास गरज आहे. आजच्या दिवशी तुम्ही मादक पदार्थांचे सेवन करू नका. नशेमध्ये तुम्ही काही किमती वस्तू हरवू शकतात. तुमच्या मनावर असलेले ओझे उचलण्यास आणि तुम्हाला पाठिंबा देण्यात नातेवाईक पुढाकार घेतील. आजच्या दिवशी मैत्री तुटण्याची शक्यता असल्यामुळे सावध रहा.

  • कर्क :

देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वत:ला गुंतवा, त्यातून तुम्हाला मन:शांती लाभेल. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. नातेवाईक, मित्रमंडळी आणि व्यवसायातील सहकारी यांच्याशी कोणताही व्यवहार करताना तुमचे हित सांभाळा. कारण ते तुमच्या गरजा, निकड यांचा विचार करणार नाहीत. तुमच्या प्रिय व्यक्तीकेड दुर्लक्ष केल्याने घरात काही तणावाचे क्षण अनुभवास येतील. तुमचे प्रेम एक वेगळी उंची गाठेल. तुमच्या प्रेमाच्या हसण्याने आजचा दिवस सुरू होईल आणि एकमेकांच्या स्वप्नांनी शेवट होईल. 

  • सिंह :

आजचा दिवस तुमच्यासाठी सक्रिय ऊर्जेचा उभारी देणारा नाही आणि तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्रासून जाल. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी कराल किंवा गृहोपयोगी वस्तुची खरेदी संभवते. एकदा तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रेम मिळाले, की मग बाकी कशाचीच गरज उरणार नाही. तुम्हाला आज या सत्याचा उलगडा होईल. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल.

  • कन्या :

संयम बाळगा, आपले निंरतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. जीवनसाथी सोबत पैश्याने जोडलेल्या कुठल्या मुद्यांना घेऊन आज वाद होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या व्यर्थ खर्चावर तुमचा साथी तुम्हाला लेक्चर देऊ शकतो. तुम्हाला आनंद देतील अशा गोष्टी करा, पण इतरांच्या कामापासून दूर रहा. तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबातील सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे तुमचा दिवस अस्वस्थतेत जाईल.

  • तुळ :

आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. या राशीतील विद्यार्थ्यांना आजच्या दिवशी अभ्यासात मन लागण्यात समस्या येऊ शकतात. आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांमुळे खराब करू शकतात. वैवाहिक आयुष्याचे काही साइड इफेक्ट्स सुद्धा असतात. त्यापैकी काही तुम्हाला आज दिसतील. आपल्या आरोग्याबद्दल विशेषकरून रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

  • वृश्चिक :

व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकतात. क्वचित भेटीगाठी होणाºया लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस. तुमच्या मैत्रीमधील चांगला काळ आठवा आणि त्या आठवणींना उजाळा देऊन नव्याने मैत्रीपूर्ण वाटचाल करा. महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे. 

  • धनु :

आजच्या दिवशी तुम्ही स्वीकारलेले धर्मादाय काम तुम्हाला मानसिक समाधान आणि आराम मिळवून देईल. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल - त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. कामाच्या जागी आपण स्वत:ला खूपच खेचल्यामुळे कौटुंबिक गरजा आणि आवश्यकता, अपेक्षांकडे दुर्लक्ष होऊ शकते. कुणीतरी तुम्हाला शुभेच्छा देईल, अभिनंदन करील. तुम्हाला अपेक्षित असलेली कौतुकाची थाप, मान्यता आणि पारितोषिके मिळण्याचा प्रसंग पुढे ढकलण्यात आल्याने तुम्ही निराश व्हाल.

  • मकर :

तुमच्या विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. मालमत्ताविषयक कामे होतील आणि उत्तमपैकी नफा होईल. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. काहीजणांसाठी विवाहाचे योग आहेत तर अन्य लोकांना प्रियाराधन करण्यामुळे उत्साह वाटेल. नवीन गोष्टी शिकण्याकडे तुमचा कल असून तो उल्लेखनीय ठरेल. आजच्या दिवशी केलेले स्वयंसेवी कामाचा उपयोग केवळ ज्यांना मदत केली त्यांनाच न होता स्वत:कडे सकारात्मकपणे पाहण्यास होईल.

  • कुंभ :

तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. जर तुम्ही आपल्या घरातील व्यक्तीकडून काही उधार घेतले असेल तर, आज त्यांना ते परत करा अथवा तुमच्या विरुद्ध ते कोर्टात कार्यवाही करू शकतात. सामाजिक कामात रमाल परंतु अन्य लोकांना तुमची गुपिते सांगणे टाळा. काहीजणांसाठी विवाहाचे योग आहेत तर अन्य लोकांना प्रियाराधन करण्यामुळे उत्साह वाटेल. नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांना आज कार्य-क्षेत्रात समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

  • मीन :

तुमची कमकुवत जीवनेच्छा तीव्र विषासारखी शरीरावर विपरीत परिणाम करील. म्हणून कलात्मक आनंद देणा-या कामात स्वत:ला गुंतवून घ्या आणि आजाराशी सामना करण्यास तयार राहा. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील. सगळ्यासाठी प्रेम हाच पर्याय आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com