Aloo Chilla Recipe : लहान मुलांना आवडणारा चटपटीत 'आलू चीला' बनवा या सोप्या स्टेपसह...

जेव्हाही थोडीशी भूक लागली असेल किंवा नाश्त्यात काहीतरी वेगळे खावेसे वाटत असेल तेव्हा 'आलू चीला' हा एक उत्तम पर्याय असू शकतो.
Aloo Chilla Recipe
Aloo Chilla Recipe Dainik Gomantak
Published on
Updated on

जेव्हाही थोडीशी भूक लागली असेल किंवा नाश्त्यात काहीतरी वेगळे खावेसे वाटत असेल तेव्हा 'आलू चीला' हा एक उत्तम पर्याय असू शकतो. बेसन चीला अनेकदा घरांमध्ये खाल्ला जातो, पण तुम्ही कधी बटाट्याचा चीला चाखला आहे का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला आलू चीला बनवण्याची अतिशय सोपी रेसिपी सांगणार आहोत. आलू चीला ची रेसिपी लहान मुलांना खूप आवडते आणि ती सर्व वयोगटातील लोक खूप आवडीने खातात.

चीला अनेक प्रकारे बनवला जातो. बेसन चिला, रवा चीला, आलू चिला खूप प्रसिद्ध झाले आहेत. आलू चीला बनवण्यासाठी बटाट्याशिवाय कॉर्न फ्लोअर, बेसन आणि इतर मसाले लागतात. चला जाणून घेऊया आलू चीला बनवण्याची सोपी पद्धत.

Aloo Chilla Recipe
Feng Shui Tips : करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी फेंगशुईच्या या 5 टिप्स वापरून पहा

आलू चीलासाठी साहित्य

बटाटे - 3-4

कॉर्न फ्लोअर - 2 चमचे

बेसन - 2 चमचे

जिरे - 1 टीस्पून

चिरलेला हिरवा कांदा - 2 टेस्पून

हिरवी मिरची - 2

काळी मिरी पावडर - 1/2 टीस्पून

तेल - 2 टेस्पून

मीठ - चवीनुसार

आलू चीला कसा बनवायचा

आलू चिला बनवण्यासाठी प्रथम बटाट्याचे साल काढून घ्या. यानंतर, बटाटे 10-15 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा, जेणेकरून बटाट्यातील स्टार्च बाहेर येईल. यानंतर बटाटा किसून चांगला पिळून त्याचे पाणी पूर्णपणे काढून टाका. आता किसलेले बटाटे मिक्सिंग बाऊलमध्ये ठेवा. त्यात कॉर्नफ्लोअर आणि बेसन घालून मिक्स करा. यानंतर काळी मिरी पावडर, जिरे, हिरवी मिरची, हिरवा कांदा, मीठ यासह इतर गोष्टी घालून मिश्रण मिक्स करा.

आता या मिश्रणात जास्त पाणी असल्यास त्यात बेसन जास्त घालता येईल. यानंतर नॉनस्टिक पॅन घ्या आणि मध्यम आचेवर गरम करा. तवा गरम झाल्यावर त्यावर थोडं तेल टाकून सगळीकडे पसरवा. यानंतर बटाटा- बेसनचे द्रावण एका भांड्यात घेऊन तव्यावर ठेवा आणि शक्य तितके पातळ होईपर्यंत पसरवा. यानंतर भोवती तेल टाकून भाजून घ्या. चीला दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर एका प्लेटमध्ये काढा. चवदार बटाट्याचा चीला तयार आहे. त्यांना चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com