Copper Water Benefits
Copper Water BenefitsDainik Gomantak

तांब्याच्या भांड्यात पाणी किती वेळ ठेवणं लाभदायी ?

Copper Water Benefits: तांब्याच्या भांड्यातील पाण्याचा योग्य वापर करणे गरजेचे आहे.
Published on

तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी आरोग्यदायी असते. ही आपल्या देशातील एक पुरातन परंपरा आहे. आयुर्वेदामध्ये ही तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे आरोग्यदायी मानले जाते. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने अनेक आजार दूर होतात. जुलाब, पोटदुखी, अतिसार यांसारख्या आजारांपासून सुटका होते. तांब्याच्या (Copper) भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायल्याने शरीरातील तांब्याची गरज पूर्ण होते. पण तांब्याच्या भांड्यातील पाणी कधी पिऊ नये, तांब्याच्या भांड्यात पाणी किती वेळ ठेवणं चांगले आहे हे तुम्हाला माहित आहे का ?चला तर मग जाणुन घेउया सविस्तरपणे (copper water benefits best time drink copper water News)

* तांब्याच्या भांड्यात किती वेळ पाणी ठेवणे चांगले
तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्याचा फायदा मिळवण्यासाठी हे पाणी तांब्याच्या भांड्यात 12 ते 48 तास ठेवावे. नंतर सकाळी रिकाम्या पोटी हा पाणी प्यावे. जर तुम्हाला तांब्याच्या भांड्यातील पाणी दिवसभर प्यायचे असेल तर त्यात काहीही नुकसान नाही. पण 48 तासांपेक्षा जास्त वेळ ठेवलेलं पाणी पिऊ नका.

 Copper Water Benefits
International Yoga Day: सकाळी उठण्यासाठी 'ही' 4 आसने फायदेशिर, आळस होईल दूर

* तांब्याचे पाणी पिण्याचे तोटे
तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिण्याचं कोणतंही नुकसान नाही. पण जेव्हा तुम्ही हे पाणी जास्त प्रमाणात किंवा जास्त काळ वापरता तेव्हा शरीरात तांब्याचे प्रमाण अधिक होते. असे झाल्यास तुम्हाला मळमळ, उलट्या, ओटीपोटात दुखणे किंवा अतिसार यासारखी लक्षण दिसू शकतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करून पाण्याचं सेवन करत असाल तर किडनीचे आजारही होऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com