Paneer Pakoda Recipe
Paneer Pakoda RecipeDainik Gomantak

Cooking Tips: पनीर पकोडा बनेल क्रिस्पी, फक्त फॉलो करा 'या' सिंपल ट्रिक्स

Cooking Tips: पनीर पकोडा कुरकुरीत बनवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. कारण कुरकुरीत पकोडो खाण्याची मज्जाच वेगळी असेल.
Published on

cooking tips how to make crispy paneer pakoda note recipe

पनीर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. तुम्ही पनीरपासून विविध पदार्थ बनवत असाल पण तुम्ही पनीर पकोडे बनवले आहेत का?

चहासोबत पकोड्यांचे कॉम्बिनेशन अगदी उत्तम आहे. या डिशची खास गोष्ट म्हणजे ती पूर्णपणे देशी आहे आणि ती आपल्या प्राचीन इतिहासाचाही एक भाग आहे. तुम्ही कधीही व्हेज किंवा नॉनव्हेज पकोडे ट्राय करू शकता.

पनीर पकोडे खाल्ल्यास चहाचा आनंद नक्कीच दुप्पट होईल. पण जर तुम्ही घरच्या घरी कुरकुरीत पनीर पकोडे बनवण्याचा प्रयत्न करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

  • तांदळाचे पीठ

कुरकुरीत पनीर पकोडे बनवण्यासाठी तुम्ही मिश्रणात तांदळाचे पीठ घालू शकता. तांदळाचे पीठ घातल्याने पकोडे खूप कुरकुरीत होतात. बेसन वापरत असाल तर त्यात थोडे तांदळाचे पीठही टाका. जर तुम्ही 1 कप बेसन घेत असाल तर अर्धा कप तांदळाचे पीठ घालावे.

पाणी कमी वापरा आणि पीठ थोडे घट्ट ठेवावे. पिठात बेसनासोबत थोडे तांदळाचे पीठ मिक्स करावे. यानंतर पिठात चांगले मिसळा. आता या पिठात पकोडे बुडवून तळून घ्या. पकोडे चांगले कुरकुरीत होतील हे पहा.

  • पिठात रवा मिक्स करावा

तुम्हाला हवं असल्यास पकोडाच्या पिठात रवाही मिक्स करू शकता. पिठात नीट मिक्स करून झाल्यावर, पीठ बनवण्यापूर्वी एका कपमध्ये रवा, मैदा आणि थोडे बेसन यांचे मिश्रण तयार करून पिठात मिक्स करावे.

तुम्ही पिठाचे प्रमाण लक्षात घेऊन पिठ तयार करू शकता. यानंतर, जेव्हा तुम्ही पनीर पकोडे बनवाल तेव्हा ते अगदी कुरकुरीत होईल.

  • पकोड्यांची चव वाढवण्यासाठी का करावे?

पकोड्याची चव वाढवायची असेल तर पिठात साखर आणि पाणी मिक्स करावे. एका भांड्यात 1 चमचे बेसन आणि 2 चमचे साखर यांचे मिश्रण तयार करावे आणि ते पिठात मिक्स करावे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार प्रमाण वाढवू किंवा कमी करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com