Smart Cooking Hacks
Smart Cooking HacksDainik Gomantak

Cooking Hacks: घरीच लावा मलाईदार अन् घट्ट दही, वापरा 'या' 4 भन्नाट ट्रिक

तुम्हीही घरी विरजनाशिवाय घरीच मलाईदार आणि घट्ट दही लावू शकता.
Published on

Cooking Hack: दही खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. दह्याचे अनेक प्रकारे सेवन करता येते. अनेक लोक ताक,चटणी किंवा कोशिंबीर करून सेवन करतात. अनेक लोक बाजारतून विकत दही आणतात. पण तुम्हाला घरीच मलाईदार आणि घट्ट दही लावयचे असेल तर तुम्ही पुढिल ट्रिक्स वापरू शकता.

लिंबाचा रस

दही लावण्यासाठी तुम्ही लिंबाच्या रसाचा वापर करू शकता. यासाठी दूध कोमट करावे आणि नंतर एका भांड्यात काढून घ्यावे. नंतर त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस मिक्स करावा. आता ते चमच्याने दुधात चांगले मिक्स करावे. भांडे सुती कापडाने झाकून 10-11 तास ठेवा.खाण्यायोग्य मलाईधार आणि घट्ट दही तयार होईल.

हिरवी मिरची
दही लावण्यासाठी तुम्ही ताजी हिरवी मिरची वापरू शकता. यासाठी कोमट दूध एका भांड्यात घाला आणि 2 मिरच्या त्यांच्या देठांसह, नीट धुवून टाकाव्या. नंतर ते झाकून ठेवावे. 12 तास गरम ठिकाणी ठेवावे. खाण्यायोग्य मलाईधार आणि घट्ट दही तयार होईल.

लाल मिरची

हिरव्या मिरच्यांप्रमाणे तुम्ही दही लावण्यासाठी लाल मिरचीचा वापर करू शकता. यासाठी कोमट दुधात देठासह 2-3 मिरच्या टाकाव्या आणि चांगले झाकून ठेवावे. 12 तासांच्या आत, पूर्णपणे घट्ट दही खाण्यासाठी तयार होईल.

चांदीच्या वस्तु
जर तुमच्याकडे चांदीची नाणी किंवा दागिने असतील तर तुम्ही दही अगदी सहज लावू शकता.
यासाठी एका भांड्यात कोमट दूध काढून त्यात चांदी टाकून भांडे चांगले झाकून ठेवावे. 12 तासनंतर दही घट्ट आणि मलाईदार झालेले दिसेल. पण लक्षात ठेवा की चांदी पूर्णपणे स्वच्छ असावी.

कोणती काळजी घ्यावी

दही लावण्यासाठी नेहमी फुल क्रीम दूधच वापरावे.  आंबट पूड नीट उकळून ते घालण्यापूर्वी थोडे थंड करायला विसरू नका. दही जास्त आंबट नको असेल तर तुम्ही फ्रिजमध्ये ठेऊ शकता.

दही खाण्याचे फायदे

दह्याचे नियमितपणे सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते.

उन्हाळ्यात दही खाल्ल्याने शरीराचे तापमान कमी राहते.

दह्यामध्ये असलेले घटक हाड मजबुत ठेवण्यास मदत करतात.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यसाठी दही खाण्याचा सल्ला दिला जातो.

वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर दही खावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com