Cooking Hacks: बटरमध्ये ग्रेव्ही बनवत असाल तर या गोष्टी ठेवा लक्षात, चव होईल द्विगुणित

Cooking Hacks: जर तुम्ही बटरमध्ये कोणतेही भाजी बनवत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. कारण तेव्हाच त्याची चव अधिक द्विगुणित होईल.
Cooking Tips
Cooking TipsDainik Gomantak
Published on
Updated on

cooking hacks try these hacks while you use butter

कोणतेही भाजी किंवा पदार्थ बनवतांना तेलाचा वापर केला जातो. यामुळे पदार्थाची चव वाढते. तेलाशिवाय आपण पदार्थ शिजवू शकत नाही आणि आपण जे पदार्थ तयार करतात ते बेचव होतात. पण, तेल व्यतिरिक्त, बरेच लोक बटर वापरतात, ज्यामुळे पदार्थची चव द्विगुणित होते. पण बटर वापरतांना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

  • तेलात करावे मिक्स

बटर खूप लवकर जळते. यामुळे बटरमध्ये एक ते दोन चमचे तेल घातल्यास ते जळणार नाही. तेल घातल्याने केवळ बटरचे टेक्चर पातळ होणार नाही तर त्याची चवही वाढेल.

या व्यतिरिक्त तुम्ही बटर घालण्यापूर्वी तेल देखील वापरू शकता कारण काहीवेळा बटर वितळण्यास सुरवात होते आणि ते पॅनमध्ये टाकताच जळते. ही समस्या टाळण्यासाठी सर्वात पहिले पॅनमध्ये तेल टाका आणि मगच बटर घाला.

  • गॅसच्या स्पीडवर लक्ष ठेवावे

बटरमध्ये पदार्थ शिजवताना गॅसची स्पीड आणि तापमान लक्षात ठेवावे. बटर खूप गरम किंवा खूप थंड नसावे. जर तुम्ही खूप जास्त स्पीडवर बटर गरम केले तर ते जळते. बटर कमी स्पीडवर शिजणार नाही आणि आपण अधिक वेळ घालवाल.

तसेच, बटरमध्ये पदार्थ तळण्यासाठी गॅसची योग्य स्पीड ठेवावी. यासाठी, तुम्हाला बटर सतत ढवळावे लागेल आणि पॅनमध्ये थोडे थोडे बटर मिक्स करावे.

  • बटर कसे वापरावे

अनेक लोक सामान्यपणे बटर वापरतात. काही लोक ब्रेडला लावून खातात. परंतु तुम्हाला माहित आहे का की ते वेगवेगळ्या पद्धतीने देखील वापरले जाऊ शकते जसे की - जर तुमची ग्रेव्ही किंवा सॉस पातळ झाला असेल तर ते बटर वापरून घट्ट करता येऊ शकते.

  • ग्रेव्ही असणाऱ्या भाजीमध्ये बटर कसे वापरावे

ग्रेव्ही बनवताना बटरचा वापर केला जातो. ग्रेव्ही बनवताना सुरवातीला कधीच बटर वापरू नका. त्यामुळे ग्रेव्हीची चव खराब होऊ शकते.

जर तुम्ही ग्रेव्हीची भाजी बनवत असाल तर त्यात शेवटी बटर टाकावा. असे केल्याने तुम्हाला खूप फायदा होईल आणि ग्रेव्हीची चवही वाढेल.

  • बटर कसे स्टोअर करावे

बटर स्टोअर करण्यासाठी तुम्ही फ्रिजचा वापर करू शकता. पण बटर वापरण्यापुर्वी १५ मिनिटं आधी बाहेर काढावे आणि मगच वापरावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com