Cooking Hacks: स्वयंपाकघरात विशेषत: स्वयंपाक करणे, अनेक लोकांसाठी अवघड असते. पाककला ही एक कला आहे. यामध्ये प्रत्येकाने प्रभुत्व मिळवणे आवश्यक नाही.
जर तुम्ही नवशिक्या असाल तर तुमच्यासाठी ते अधिक कठीण होऊ शकते. बॅचलरसाठी स्वयंपाक करणे हे सर्वात मोठे काम असते. तुम्ही पुढील काही टिप्सच्या मदतीने स्वयंपाक बनवणे सोपे होईल.
बटर चिकन
बटर चिकन बनवण्यासाठी सर्वात पहिले काजू आणि मलई एकत्र बारीक करून त्यात मीठ, हळद, धने, गरम मसाला घालून पुन्हा बारीक करावे. नंतर ते शिजवून घ्या आणि नंतर त्यात चिकनचे तुकडे टाकावे आणि वरून क्रीम लावून शिजवा.
सिमला मिर्ची
सिमला मिर्ची पहिल्यांदाच बनवत असाल तर ही ट्रिक तुम्हाला मदत करेल. यासाठी सर्वात पहिले सिमला मिर्ची चाकुच्या मदतीने चिरावे आणि चमच्याच्या मदतीने बिया काढून घ्या. यानंतर बटाटे, कांदे आणि टोमॅटोचा मसाला तयार करून त्यात भरावे. यानंतर कुकरमध्ये ५ मिनिटे वाफवून घ्या किंवा तळून घ्या.
पास्ता सॉस
तुम्हाला झटपट पास्ता सॉस बनवायचा असेल तर यासाठी सर्वात पहिले दूध, मैदा, लोणी आणि मलई मंद आचेवर शिजवून घ्यावे. ओरेगॅनो, चिली फ्लेक्स आणि मीठ घालून आणखी 20 सेकंद शिजवावे. त्यात उकडलेला पास्ता घाला, मिक्स करा आणि आस्वाद घ्या.
चणे कसे शिजवावे
जर तुम्ही रात्री हरभरा भिजवायला विसरलात तर टेंशन घेऊ नका. यासाठी सर्व प्रथम गरम पाणी उकळून त्यात हरभरा टाका. थोडा वेळ शिजवून घेतल्यावर हरभरा चांगला शिजेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.