Curd
Curd Dainik Gomantak

Smart Cooking Hacks: 'या' टिप्स वापरून दह्याचा आंबटपणा करा कमी

जर दही खूप आंबट झाले तर ते फेकून न देता त्याचा आंबटपणा कमी करण्यासाठी या टिप्स वापरा.
Published on

Smart Cooking Hacks: दही खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसेच दह्याचा पुजेमध्ये वापर केला जातो. उन्हाळ्यात दही खाणे अधिक चांगले असते. पण दही जास्तच आंबट झाले तर खाल्या जात नाही. अशावेळी लोक आंबट दही फेकून देतात. तुम्हीही असे करत असाल तर थांबा. कारण दह्याचा आंबटपणा सहज कमी करण्यासाठी काही टिप्स वापरू शकता.

  • दही आंबट होण्याचे कारण कोणते?

दही लावताना काळजी घेणे गरजेचे आहे. जर दही लावल्यानंतर तसेच गरम वातावरणात ठेवले तर दही जास्त आंबट होते.

  • दह्याचा आंबटपणा कमी करण्यासाठी काय करावे

दह्याचा आंबटपणा कमी करण्यासाठी सर्वात पहिले त्याचे पाणी काळजीपूर्वक वेगळे कराने. आता त्यात थंड पाणी घालावे आणि चमच्याने हळू हळू हलवावे. लक्षात ठेवा की दह्याची क्रीम विरघळू नये. नंतर चाळणीतून गाळून त्यातील पाणी वेगळे करा.

Curd
Car Mileage Tips: जुनी कार खूपच इंधन खातेय? 'या' सोप्या टिप्सने वाढवता येईल मायलेज
  • आंबट दह्यामध्ये 'या' गोष्टी मिक्स करावे

एकदा दही गाळून पाणी वेगळे काढावे. नंतर त्यात एक वाटी थंड दूध घालावे. आता ते झाकून 2-3 तास ठेवावे. यानंतर दह्याचा आंबटपणा कमी होईल. तुम्ही दही खाऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com