National Consumer Day: तुमच्यासोबत फ्रॉड करताना चोरटे वापरतात 'या' ट्रिक्स

आपली फसवणुक होऊ नये म्हणून लोकांनी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
National Consumer Day
National Consumer DayDainik Gomantak

Consumer Day: फ्रॉड करणारे लोक सामान्य नागरिक विचार करु शकत नाही त्यापेक्षा चार पाऊलं पुढेच असतात. त्यांच्या फ्रॉड करण्याच्या पद्धतीत पण दिवसोंदिवस बदल होत आहेत. आदीपेक्षा जास्त स्मार्ट पद्धतीने चोरी होत आहे. त्यामुळे ग्राहकांचे मोठे नुकसान होते. पण आपली फसवणुक होऊ नये म्हणून लोकांनी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

सामान्य व्यक्तींची कशा प्रकारे फसवणुक होऊ शकते, त्यासाठी चोरटे काय करतात याबद्दल आपण जाणून घेऊया. समजा तुम्ही ऑनलाईन साईडवरुन काही सामान ऑर्डर केले असेल. ती ऑर्डर मिळाल्यानंतर तुम्ही वस्तू काढून घेता आणि त्याचा बॉक्स कचऱ्याच्या डब्ब्यात सरळ टाकुन देता. पण त्याच बॉक्सवर चिटकलेल्या बिलावर तुमचं नावं, फोन नंबर, पत्ता सर्व लिहीलेले असते.

National Consumer Day
National Consumer Day: कोणत्याही हॉटेलमध्ये पिऊ शकता मोफत पाणी जाणून घ्या अशाच काही रंजक गोष्टी

चोरटा ती माहीती घेऊन तुमच्या घरी डिलीवरी बॉयसोबत एक कॅश ऑन डिलीवरी असणारे पार्सल पाठवेल आणि मोठ्या कंपनीचे नाव पण सांगेल. पण तुम्ही तर कोणतं पार्सल ऑर्डर केलं नाही, असं जेव्हा त्याला सांगता तेव्हा तो मग तुमची ऑर्डर कॅन्सल करा, मी कस्टमर केअरला कॉल लावून देतो, असं म्हणेल.

पुढे तुम्ही त्या नंबरवर कॉल केल्यानंतर ऑर्डर कॅन्सल करण्यासाठी तुमच्या नंबरवर एक ओटीपी येईल तो सांगा, असं कॉलवर म्हणलं जाईल. तुम्ही ओटीपी देताच तुमच्या बॅंक खात्यातील पैसे गायब होऊ शकतात. यापासून वाचण्यासाठी ऑनलाईन ऑर्डरचा तो बॉक्स सरळ कचऱ्यात फेकू नका.

तसेच, अनेक लोकांना शॉपिंगनंतर बिल काही कामाचे नाही म्हणतं ते फेकून देणयाची सवय असते. चोरटे याचाच फायदा घेऊन आपला डाव साधतात. तुम्हाला फ्रॉड कॉल करत म्हणले जाते की तुम्ही काही दिवस आदी शॉपिंग केली होती.

त्यात एका लकी ड्रॉमध्ये तुम्ही विजेते ठरले आहात आणि तुम्हाला एक भेटवस्तू मिळणार आहे, पण तुम्हाला त्यासाठी एक मॅसेज येईल. त्यावर आपल्या माहीती भरावी लागेल. तुम्ही मॅसेजमध्ये आलेल्या लिंकवर क्लिक केले तर तुमचं बॅंक अकाउंट हॅक होऊ शकतं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com