कलाकारांच्या सन्मानासाठी ‘रवींद्र भवना’ची उभारणी; उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मोरजी येथील संगीत संमेलनात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील कलाकारांचा (Artist) सत्कार करण्यात आला.
Goa Artists
Goa Artists Dainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी :कलाकारांनी (Goa Artists) ही संगीत संस्कृती टिकवली; त्यांच्यासाठी आता हक्काचे व्यासपीठ ‘रवींद्र भवन’ उभारले जाईल, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे”, असे आवाहन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी वारखंड येथे पंडित वामनराव पिळगावकर शिष्य व हितचिंतक परिवार तर्फे आणि गोवा पर्यटन (Goa Tourism) खाते श्री. देवी माऊली शांतादुर्गा देवस्थान वारखंड पेडणे यांच्या संयुक्त विद्यमाने वारखंड येथील श्री शांतादुर्गा देवस्थान येथे आयोजित केलेल्या संगीत संमेलनात विविध क्षेत्रातील कलाकारांचे सत्कार समारंभाला केले.

Goa Artists
गोव्यातील 18 वर्षांवरील महिलेला मिळणार दरमहा 1000 रूपये

यावेळी व्यासपीठावर गणेश पार्सेकर, देवस्थान अध्यक्ष हनुमंत परब पंडित, मोहनदास पोळे, महाबळेश्वर चारी, गोरख मांद्रेकार, विशांत पिळगावकर आदी उपस्थित होते. सुरेश केरकर यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत तर प्रशांत मांद्रेकार यांनी सूत्रसंचालन केले. ‘कलाकारांनी निस्वार्थी भावनेने काम केले, कला टिकवली, त्यांनी पैशांकडे न पाहता संस्कृती टिकवायला काम केले, कलाकारांना जेवढा मान आहे तेवढा मान नेत्यांना मिळत नाही, कलाकारांचा सन्मान आपल्या हातून होतोय, हाच आपला सत्कार आहे. आयोजन समितीने जाणकार कलाकारांचा सन्मान करून एक चांगला पायंडा घातला आहे’, असे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी सांगितले. शिवाय आतापर्यंत मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत आणि त्यासाठी आता 30 हजार चौ. मी. जागा रवींद्र भवनसाठी उपलब्ध केल्याचे आजगावकर म्हणाले.

Goa Artists
पावसाच्या सावटातही झाला दिव्यांच्या लखलखाट!

सत्कारमूर्ती कलाकार :

यावेळी रामदास परब नाट्यकलाकार, विठ्ठल परब रंगभूषाकार, रामचंद्र शेटकर नाट्यकलाकार, नारायण परब नाट्य भजनी कलाकार, लक्ष्मन शेट्ये तबलावादक, भानुमती मालपेकर, नाट्यकलाकर, संतोष मलिक नाट्यकलाकर, केशव परब नाट्यकलाकार, नागेश परब नाट्यकलाकार, रमेश पालयेकर भजनी कलाकार, अनंत गावस नाट्यकलाकार, शिवराम शेट्ये नाट्यकलाकार, दिगंबर गाड हार्मोनियमवादक, दत्ताराम कांबळी भजनी कलाकार, एकनाथ सावळ देसाई नाट्य कलाकार, सदानंद विर्नोडकर नाट्यकलाकार, सहदेव धारगळकर भजनी कलाकार, लक्ष्मण नाईक नाट्यकलाकार, विश्राम नाईक नाट्य कलाकार, सखाराम मालवणकर व्हायोलीनवादक, विनायक महाले नाट्यकलाकार, रमेश पवार भजनी कलाकार, गोपाळ नाईक नाट्यकलाकार, शांबा शेट्ये भजनी कलाकार, रत्नाकांत परब नाट्यकलाकार, सहदेव नाईक तबला वादक, सत्यवान नाईक तबला, रामा कवळेकर भजनी कलाकार, प्रभाकर नाईक नाट्यकलाकार, रमेश राऊळ हार्मोनियम वादक, तुळसीदास नाईक नाट्यकलाकार, गोपाळ नाईक नाट्यकलाकार, पुनाजी सावंत भजनी कलाकार, विश्राम महाले हार्मोनियम, उत्तम गवस नाट्यकलाकार, पांडुरंग कोरगावकर भजनी कलाकार, सखाराम सावळ देसाई नाट्यकलाकार, आत्माराम परब नाट्यकलाकार, विठोबा खाजनेकर पखवाजवादक, बाबू वरक नाट्यकलाकार, शशिकांत शेट्ये भजनी कलाकार, लाडू नाईक हार्मोनियमवादक, बाळा राऊळ भजनी कलाकार, राघोबा नाईक नाट्यकलाकार, नूतन पेडणेकर नाट्यकलाकार, बंड्या धारगळकर तुळसीदास परब तबलावादक आणि विश्वनाथ पेडणेकर नाट्यकलाकार यांचा सत्कार शाल, श्रीफळ तसेच स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.

Goa Artists
‘नो मास्क-नो टोकन’; दूधसागरला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी कडक नियम

कलाकारांसाठी योगदान :

हा सन्मान मतदार संघातील कलाकारांचे योगदान लक्षात घेऊन त्यांना न्याय मिळवून देणारा आहे. जी झाडे लावली त्याची फळे मतदार संघातील युवकांना रोजगाराच्या माध्यमातून मिळणार त्यासाठी सर्व कलाकारांनी आपणास येत्या निवडणुकीत सहकार्य करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी केले.

शेवटी गोरख मांद्रेकर यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com