Side Effects Of Coffee: सकाळी रिकाम्या पोटी एक कप कॉफी पिणे ठरु शकते 'या' आजाराचे कारण

सकाळी तुम्ही पण रिकाम्या पोटी कॉफी पित असाल तर ही काळजी घ्या.
Side Effects Of Coffee
Side Effects Of CoffeeDainik Gomantak

अनेकांना सकाळी कॉफी प्यायची सवय असते. काही लोकांना दिवसातून तीन-चार कप कॉफी प्यायची सवय असते. कॉफी प्यायल्याने झोप जाते असे बोलले जाते. अनेकांच्या दिवसाची सुरुवात कॉफीनेच होते. जर तुम्हाला रोज सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी कॉफी प्यायची सवय असेल तर तुम्हाला गंभीर समस्यांचा सामना करावा लागेल. सकाळी रिकाम्या पोटी कॉफी पिणे शरीरीसाठी हानिकारक ठरू शकते.

  • सकाळी रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने या समस्यांचा करावा लागेल सामना

सकाळी रिकाम्या पोटी कॉफीचे सेवन करू नये. खास म्हणजे महिलांनी रिकाम्या पोटी कॉफी पिणे टाळावे. कारण सकाळी रिकाम्या पोटी कॉफीचे सेवन केल्याने शरीरातील कोर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते. ज्यामुळे ओव्हुलेशन, वजन आणि हार्मोन्सवर वाईट परिणाम होतो. शरीरात स्ट्रेस हार्मोन्सची पातळी सकाळी जास्त आणि संध्याकाळी कमी असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही सकाळी सर्वात आधी कॅफिनचे सेवन करता तेव्हा कोर्टिसोलची पातळी कमी होते. कोर्टिसोल हार्मोन आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.

सकाळी उठल्यानंतर तुम्ही आधी 2 ते 3 ग्लास पाणी पिल्यास शरीरासाठी फायदेशीर असते. पाणी प्यायल्यानंतर तुम्ही कॉफी किंवा चहा काहीही पिऊ शकता. सकाळी उठल्याबरोबर तुम्ही पाण्याऐवजी लिंबाचा रस आणि मध मिसळून ते पिऊ शकता.

Side Effects Of Coffee
Guru Gobind Singh Jayanti 2022: गुरु गोविंद सिंग जयंतीनिमित्त जाणून घ्या 5 खास गोष्टी
  • सकाळी वर्क-आऊटच्या आधी कॉफी प्या

कॉफी जास्त प्यायल्याने शरीराची उष्णता वाढू शकते. वर्क आऊट करताना जर तुम्हाला कॅलोरी बर्न करायचे असतील, तर तुम्हाला कॉफी प्यायल्याने ऊर्जा मिळेल. त्यामुळे वर्क आऊट करताना किंवा वर्क आऊटच्या नंतर तुम्ही कॉफी पिऊ शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com