उन्हाळा जवळ जवळ आला आहे. अशा स्थितीत आता रोज नारळ पाणी पिण्याची सवय तुमच्या आहारात समाविष्ट करावी. कारण नारळ पाणी पिण्याचे मोठे फायदे आहेत, जे जाणून तुम्ही देखील थक्क व्हाल. असे मानले जाते की नारळाचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊया नारळ पाणी पिण्याचे काय फायदे आहेत.
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते
रक्तदाब (blood pressure) नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. असे मानले जाते की नारळाच्या पाण्याचा रक्तदाब नियंत्रित करण्यात मोठा हातभार आहे.
रोगप्रतिकार शक्ती देखील मजबूत होईल
नारळपाणी (Coconut water) प्यायल्याने आपली प्रतिकारशक्ती मजबूत होते. नारळात सुमारे 600 मिलीग्राम पोटॅशियम आढळते. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्तीही (immunity) मजबूत होते.
नारळपाणी फायदेशीर ठरते
उलट्या आणि जुलाबाच्या समस्येवरही नारळ पाणी खूप गुणकारी आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही नारळाचे पाणी प्याल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. नारळपाणी प्यायल्याने उलट्या, जुलाब, पोटात जळजळ, आतड्यांमधली जळजळ, अल्सर या समस्याही दूर होतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.