Cloths Washing Tips: कपडे धुताना रंग जातो का? मग वापरा 'या' ट्रिक्स

Cloths Washing Tips: सुती कपड्यांमधून रंग येणं सामान्य आहे. हे फक्त एका धुतल्यानंतर निघून जाते. जर तुम्हालाही कपड्यांचा रंग फिकट होण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल तर पुढील टिप्स नक्की फॉलो करू शकता.
Cloths Washing Tips
Cloths Washing TipsDainik Gomantak
Published on
Updated on

cloths washing tips how to stop color fading of cloths when you wash read tricks

जेव्हा आपण बाजारातून नवे कपडे विकत घेतो तेव्हा त्याचा रंग फिका पडेल का असा प्रश्न पडतो. निळे, लाल, गुलाबी रंगाचे सुती कपडे नेहमी रंग सोडतात. हे कपडे पहिल्यांदा धुतल्यानंतर अधिक रंग सोडतात, परंतु दुसऱ्या किंवा तिसऱ्या धुतल्यानंतरही ते रंग सोडणे थांबवत नाहीत. परिणामी, कपडे फिकट होतात आणि घालता येत नाहीत.

अनेक वेळा महिलांना या समस्येचा सामना करावा लागतो. तुम्ही पुढील ट्रिक्स वापरून कपड्यांचा रंग नव्यासारखा ठेऊ शकता.

मीठ वापरा

सर्वात पहिले अर्धी बादली पाण्यात 50-60 ग्रॅम तुरटी घाला.

नंतर त्यात साधारण दोन मूठभर मीठ टाका.

नंतर हळूहळू सर्व कपडे या पाण्यात टाका.

कपडे किमान दोन तास भिजत ठेवावेत.

आता प्रत्येक कापड उचलून स्वच्छ पाण्यात टाका. जेणेकरून मीठ आणि तुरटी पूर्णपणे निघून जाईल.

व्हिनेगरचा वापर

कपड्यांमधून मीठ आणि तुरटी जमा होण्यासाठी तुम्ही व्हिनेगर वापरू शकता. कपड्यांचा रंग परत जाऊ नये असे वाटत असेल तर ते व्हिनेगर पाण्यात टाका. कमीत कमी अर्धा तास कपडे भिजत ठेवा आणि नंतर कपडे मुरगळून वाळवा. लक्षात ठेवा की कपडे सावलीत वाळवावेत, जेणेकरून ते उन्हात कोमेजणार नाहीत.

फॅब्रिक डाई वापरा

काही वेळा कपडे वारंवार धुतल्यानंतरही कपड्यांचा रंग निघून जातो. त्यामुळे कपडे पूर्णपणे खराब होतात आणि ते फेकून द्यावे लागतात. असे झाल्यास, कपडे धुताना तुम्ही फॅब्रिक डाई वापरू शकता. परंतु ते वापरण्यापूर्वी, आपण कपड्यांवरील लेबल काळजीपूर्वक वाचले पाहिजे.

या गोष्टी ठेवा लक्षात

जर तुम्ही कपडे धुण्यासाठी मीठ वापरत असाल तर सर्वात पहिले पॅच टेस्ट करावी.

कपडे धुण्यासाठी नेहमी थंड पाण्याचा वापर करावा.

उन्हाळ्यात जर तुम्ही कॉटनची साडी किंवा कॉटनची बेडशीट वापरत असाल तर वरील ट्रिक्स वापरू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com