Cleaning Tips: हळदीचा वापर अनेक स्वयंपाकघरांमध्ये केला जातो. हळदीशिवाय कोणत्याही पदार्थाला चव येत नाही. पण हळदीचा रंग तुमच्या जेवणाच्या डब्ब्याचा लूक खराब करू शकतात. कितीही घासले तरी प्लॅस्टिकच्या टिफिनमधून हळदीचा डाग कमी होत नाही. त्यामुळे तुम्ही टिफिन फेकून देता आणि दुसरा टिफिन खरेदी करता. पण हळदीचे डाग घरच्या घरी सहज कसे काढता येतात हे जाणून घेऊया.
बेकिंग सोडा
सर्वात पहिले बेकिंग सोडा आणि पाण्याचे घट्ट मिश्रण बनवावे.
नंतर हे मिश्रण टिफिनमध्ये भरून अर्धा तास तसंच राहू द्यावे. यानंतर भांडीच्या स्क्रबने हाताने स्क्रब करत राहावे. असे केल्याने टिफिनवरील हळदीचे डाग सहज निघून जातात.
जर डाग एकाच वेळी काढला गेला नाही, तर आपण ही प्रक्रिया दोनदा पुन्हा करावी.
पांढरा व्हिनेगर
सर्वात पहिले डिटर्जंटमध्ये थोडे पांढरे व्हिनेगर मिक्स करावे.
याचे प्रमाण खूपच कमी असावे. आता त्यात अर्धी वाटी पाणी घालावे.
आता टिफिनमध्ये भरा आणि 1 तास तसेच ठेवावे.
1 तासानंतर स्क्रबच्या मदतीने स्वच्छ करावे. असे केल्याने हळदीचे डाग निघून जातात.
पण लक्षात ठेवा की टिफिन उन्हात सुकवण्यासाठी ठेवावे. जर तुम्ही असे केले नाही तर तुमच्या जेवणात डिटर्जंटची चव दिसू लागेल.
लिंबाच्या रसाचा वापर
तुम्हाला 4 ते 5 लिंबाचा रस काढावा लागेल. मग त्यात बेकिंग सोडा टाकावा.
आता त्यात अर्ध्या वाटीहून थोडे कमी पाणी घालून टिफिनमध्ये 2 तास सोडावे.
नंतर स्क्रबच्या मदतीने ते घासून घ्यावे. असे केल्याने तुमच्या टिफिनवरील हळदीचे डाग सहज दूर होतील.
व्हिनेगर देखील मदत करेल
टिफिनवरील डाग दूर करण्यासाठीही व्हिनेगर उपयुक्त ठरेल.
यासाठी तुम्हाला अर्ध्या वाटी पाण्यात अर्ध्यापेक्षा थोडे कमी व्हिनेगर मिसळावे लागेल.
नंतर त्यात एका लिंबाचा रस मिक्स करावा.
नंतर टिफिनमध्ये भरून अर्धा तास सोडावे.
यानंतर तुम्ही स्क्रबच्या साहाय्याने स्वच्छ कराल तर हळदीचे डाग सहज निघून जातील.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.