Orange Peel: संत्र्याची साल पाण्यात उकळून वापरल्यास घरातील 'ही' कामे होतील सोपे

Orange Peel: संत्र्याची साल केवळ त्वचेसाठीच नाही तर घरातील अनेक कामांसाठी देखील फायदेशीर ठरते.
Orange Peel
Orange PeelDainik Gomantak
Published on
Updated on

cleaning hacks how use orange peel water cleaning

संत्री फक्त आरोग्यासाठी नाही तर तुमच्या घरातील स्वच्छतेसाठीही फायदेशीर आहे. जर तुम्ही संत्री खाल्ल्यावर साले फेकून देत असाल तर असे करू नका. कारण संत्र्याची साल अनेक प्रकारे तुमचे घर स्वच्छ करण्यास मदत करते. संत्र्याच्या सालीचे घरगुती कामासांठी कसा वापर करू शकता हे जाणून घेऊया.

गार्डनच्या कामासाठी

जर कीटक झाडे खात असतील तर तुम्ही संत्र्याच्या सालीचे पाणी टाकून ही समस्या दूर करू शकता. कीटकांपासून बचाव करण्यासाठी संत्र्याची साल सर्वात फायदेशीर आहे.

यासाठी सर्वात पहिले एका भांड्यात पाणी टाकून साल उकळावे.

त्यात लिंबाचे काही थेंब टाकावे आणि चांगले उकळू द्यावे.

पाण्याचा रंग बदलला की पाणी थंड करून बाटलीत भरून ठेवा.

आता हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये टाकून झाडांवर शिंपडावे. हे पाणी तुमच्या झाडाच्या पानांवर आणि फुलांपर्यंतही पोहोचेल.

संत्र्याचा वासामुळे किडे पळून जातील.

स्टील आणि नळ स्वच्छ करणे

भांड्यांवरचे डाग आणि नळावरचे पाण्याचे डाग, पिवळसरपणा दूर करायचा असेल तर संत्र्याच्या सालीने स्वच्छ करू शकता.

यासाठी संत्र्याची साल पाण्यात उकळून त्यात डिशवॉशिंग लिक्विड टाकावे.

यानंतर, ब्रशच्या मदतीने डाग स्वच्छ करावे.

भांडे नव्यासारखे चमकेल.

तसेच तुमच्या घरातील जुने नळही नवीनसारखे चमकू लागतील.

संत्र्याची साल उकळण्याचे काय फायदे

यासाठी सर्वात पहिले एका भांड्यात 1 ग्लास पाणी घ्यावे.

त्यात मीठ मिक्स करावे आणि संत्र्याची साल घाला.

आता पाण्याचा रंग बदलेपर्यंत पाणी उकळू द्या.

यानंतर तुम्ही पाणी थंड करून बाटलीत भरू शकता.

घरातील लाकडी दारे आणि काच स्वच्छ करण्यासाठी तुम्ही या पाण्याचा वापर करू शकता.

यामुळे त्यांची चमक कायम राहते आणि साफसफाईसाठी कोणत्याही प्रकारच्या द्रवाची आवश्यकता नसते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com