Cleaning Hacks: कपड्यांवर लागलेले रंगाचे डाग काढायचे आहे? मग वापरा 'या' ट्रिक्स

पेटिंग करताना तुमच्या कपड्यांवर रंगाचे डाग पडले असेल तर तुम्ही पुढील ट्रिक्स वापरू शकता.
Cleaning Hacks
Cleaning HacksDainik Gomantak
Published on
Updated on

Cleaning Hacks: दिवाळीपूर्वी जवळपास प्रत्येक घरात भिंती, खिडक्या, दरवाजा रंगवण्याचे काम सुरू होते. पेंट पूर्णपणे कोरडे होण्यासाठी किमान एक दिवस लागतो. अशा वेळी ये-जा करताना अनेक वेळा कपड्यांवर रंगाचे डाग पडतात.

जर कापड जुने असेल तर डाग ही पडल्यास काही काळजी वाटत नाही पण नवीन कपड्यांवर रंगाचे डाग पडले तर टेशंन येते. असे रंगाचे डाग कमी करण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

अल्कोहोल

कपड्यांवर पडलेले रंगाचे डाग स्वच्छ करण्यासाठी तुम्ही अल्कोहोलचा वापर करू शकता. यासाठी डाग असलेल्या जागेवर अल्कोहोल स्प्रे करावा आणि 5 मिनिटे तसेच ठेवावे. नंतर ते कोणत्याही डिटर्जंटने धुवावे.

डिशवॉश

कपड्यांवरील रंगांच्या डागांवर डिशवॉश लावावे आणि 15-20 मिनिटे तसेच ठेवावे. नंतर कोमट पाण्यात भाजवुन घासावे. असे एक किंवा दोनदा करावे. यामुळे तुमच्या कपड्यांवरचे डाग निघुण जातील.

कोलगेट

कपड्यांवरील रंगांच्या डागासाठी कोलगेट एक उत्तम उपाय आहे. ज्या जागी कपड्यावर गडद रंग असेल तिथे कोलगेट लावूनही तुम्ही डाग काढून टाकू शकता. कोलगेट त्या ठिकाणी काही वेळी कोलगेट लावून ठेवावे. नंतर कोलगेट सुकू द्यावे. कोलगेट सुकल्यावर कपडे धुतल्यास, डाग लगेच निघून जातो. 

नेल रिमूव्हर

कपड्यांवर रंगाचे डाग पडताच ते गरम पाण्याने धुवावे. यामुळे रंगाचा डाग बऱ्यापैकी कमी होतो. तुम्ही नेल रिमूव्हर लावून घासून शकता. डाग निघुण जाईपर्यंत असे करावे.

 रॉकेल

कपड्यांवर रंगाचे डाग असेल तर तुम्ही रॉकेलचा वापर करू शकता. यासाठी ज्या जागी कपड्यावर रंगाचे डाग असेल तेथे रॉकेल लावावे आणि घासावे.

इतर उपाय

कपड्यांवर पडलेले रंगाचे डाग हेअर स्प्रेनेही काढु शकता. यासाठी कापडावर स्प्रे करा आणि टूथब्रशने घासून घ्यावे. नतंर स्वच्छ पाण्याने कपडे धुवावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com