Chutney Pulao Recipe: घरीच झटपट ट्राय करा चटणी पुलाव, नोट करा रेसिपी

रायता, पापड आणि चटणी पुलाव या तीन पदार्थांनामुळे हिवाळ्याची मज्जाच द्विगुणित होते.
Chutney Pulao Recipe
Chutney Pulao RecipeDainik Gomantak
Published on
Updated on

Chutney Pulao Recipe: पुलाव कोणत्याही ऋतु असो खाण्याची मज्जा येते. पण सगळ्यात जास्त हिवाळ्यात खाण्याची मज्जाच वेगळी असते. हा पदार्थ बनवायला सोपी आणि खायला चवदार आहे. पुलाव देशभरात मोठ्या आवडीने खाल्ला जातो. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या थंड वातावरणात स्वतःला उबदार ठेवण्यासाठी तुम्ही चटणी पुलाव बनवू शकता आणि त्याची रेसिपी येथे आहे.

घरगुती पुलाव आरोग्यदायी आहेत का?

घरी बनवलेली प्रत्येक गोष्ट आरोग्यदायी असते. कारण त्यात तुम्ही तुमच्या सोयीनुसार चांगल्या गोष्टी वापरता. घरगुती पुलावमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल आणि भाज्या घालू शकता. घरगुती पुलावमध्ये ताजे औषधी वनस्पती आणि मसाले देखील असतात जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

चटणी पुलाव सोबत काय सर्व्ह करावे?

इतर पुलाव प्रमाणेच चटणी पुलाव देखील रायता आणि पापड सोबत गरमागरम सर्व्ह केल्यावर उत्तम चवीला लागतो. आता रायता कोणत्याही प्रकारचा असू शकतो. बुंदी, मिश्र भाज्या किंवा फळांपासून बनवू शकता. तुमच्या चटणी पुलावमध्ये भाजी नसेल तर तुम्ही मिक्स भाजी रायत्यासोबत सर्व्ह करू शकता. याव्यतिरिक्त तुम्ही लच्चा कांदा, लाल तिखट आणि लिंबाच्या रसामध्ये मॅरीनेट केलेले चिरलेला कांदा घालून चटणी पुलाव सर्व्ह करू शकता.

चटणी पुलाव रेसिपी

कढईत तेल टाकावे आणि गरम होऊ द्यावे. गरम झाल्यावर त्यात चिरलेला कांदा आणि लसूण सोबत काळी विलायची, जिरं, तेजपान घालून मिक्स करावे. आता त्यात थोडे पाणी सोबत मीठ टाकावे. ते चांगले मिक्स करावे. पाण्याला उकळी आल्यावर त्यात धुतलेला बासमती तांदूळ घालून मिक्स करावे. गॅस स्टोव्हची ज्योत कमी करा आणि झाकून ठेवावे. तांदूळ 15-20 मिनिटे शिजू द्या.

दरम्यान चटणी तयार करावी. मिक्सरमध्ये कोथिंबीर, पुदिन्याची पाने, आले, लसूण, चिरलेला टोमॅटो, चिरलेला कांदा, काळे मीठ घालून मिक्स करावे. जर तुम्हाला चटणी खूप घट्ट वाटत असेल तर त्यात थोडे पाणी घालावे. मसाल्याची पातळी तुमच्या चवीनुसार आहे याची खात्री करण्यासाठी एकदा चव घ्यावी. कढईत थोडे बटर टाकून त्यात थोडी हिंग घाला. नीट मिक्स करा आणि आता चटणी पॅनमध्ये घाला. ते उकळावे.पुलाव त्याच कढईत ठेवा आणि चटणीचे पाणी टाकावे. नंतर चटणीमध्ये पुलाव हलक्या हाताने मिक्स. काजु, कोथिंबीर घालून सजवा. तुमचा चटणी पुलाव सर्व्ह करण्यासाठी तयार आहे!

टीप: तुम्हाला तुमचा चटणी पुलाव हेल्दी बनवायचा असेल तर तुम्ही त्यात चीज आणि स्वीट कॉर्नही घालू शकता. नंतर ते 5-6 मिनिटे शिजू द्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com