आता थंडी हळूहळू कमी होत आहे आणि ऊन्हाळ्याला सुरूवात होत आहे. या बदलत्या हवामानामुळे आणि तापमानातील चढउतारामुळे अनेक आजारांचा धोकाही वाढला आहे. सकाळ-संध्याकाळ थंड आणि दुपारी गरम वातावरण असते. अशावेळी प्रकृती अस्वास्थ्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. लहान मुलांसाठी हा ऋतू खूप वाईट मानला जातो. या दिवसांमध्ये त्यांना फक्त सर्दी, विषाणू किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गाचा त्रास होत नाही तर लूज मोशन आणि ताप यासारख्या समस्या देखील होऊ शकतात.
पंखा किंवा एसी लावू नका
जेव्हा सकाळी आणि संध्याकाळी थंड वातावरण असते तेव्हा पंखा किंवा एसी लावू नका. यामुळे मुलांना सर्दी,खोकला ताप होऊ शकतो.
उबदार कपडे घालावे
अद्याप थंडी पूर्णपणे गेलेली नाही. तापमानात चढ-उतार होत आहेत. अशा परिस्थितीत या बदलत्या ऋतूत मुलांना उबदार कपडे घालणे बंद करू नका. मुलांचे घोटे आणि तळवे नेहमी झाकून ठेवावेत.
थंड पदार्थांपासून ठेवा दूर
हवामान बदलत आहे, त्यामुळे थंड वस्तू मुलांपासून दूर ठेवणे चांगले. बऱ्याच वेळा गरमागरम वाटत असताना मुले आईस्क्रीम, थंड पाणी, कोल्ड्रिंक्स अशा गोष्टींचा आग्रह धरतात. त्याचा हट्ट मान्य करू नका, त्याला समजावून सांगा, नाहीतर त्याची तब्येत बिघडू शकते.
योग्य आहार
बदलत्या ऋतूमध्ये मुले आजारी पडतात. त्यांच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता हे त्याचे प्रमुख कारण मानले जाते. अशावेळी मुलांच्या आहाराबाबत योग्य ती काळजी घेतली पाहिजे. मुलांना काय खायला द्यावे आणि काय नाही हे तज्ञांकडून जाणून घेतले पाहिजे. मुलांना फक्त घरी तयार केलेले पौष्टिक पदार्थ खायला द्यावे.
पाणी उकळावे
बदलत्या हवामानात मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल, तर त्यांना उकळलेले पाणीच द्यावे. यामुळे तो बॅक्टेरियाच्या संसर्गापासून स्वतःचा बचाव करू शकतो आणि त्याची प्रतिकारशक्ती मजबूत होते. फळं आणि भाज्या मुलांना खायला द्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.