Chaitra Navratri 2023 Upay: चैत्र नवरात्रीत 'हे' उपाय केल्यास माता दुर्गा होईल प्रसन्न

नवरात्रीच्या काळात भक्त विविध मार्गांनी मातेला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात.
Chaitra Navratri 2023 Upay
Chaitra Navratri 2023 UpayDainik Gomantak
Published on
Updated on

Chaitra Navratri 2023 Upay: चैत्र नवरात्र उद्यापासून म्हणजेच 22 मार्चपासून सुरू होत आहे. नवरात्रीमध्ये संपूर्ण नऊ दिवस माँ दुर्गेच्या विविध रूपांची संपूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. 

नवरात्रीचे हे नऊ दिवस माता दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी सर्वोत्तम मानले जातात. या नऊ दिवसांत भक्त विविध उपायांनी मातेला प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद घेतात. चला जाणून घेऊया काही सोप्या उपायांबद्दल, जे केल्याने माता दुर्गा प्रसन्न होईल.

माता दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी करावे हे उपाय

माँ दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे माता दुर्गा, लक्ष्मी आणि माँ सरस्वती यांची फोटो आपल्या घरातील पूजास्थळी लावावे. त्यांना फुलांनी सजवुन त्यांची मनोभावे पूजा करावी. 

नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस मातेचे व्रत पाळण्याची प्रतिज्ञा घ्यावी. जर ते शक्य नसेल तर पहिल्या, चौथ्या आणि आठव्या दिवशी व्रत करावे. असे केल्याने माता राणीचा आशीर्वाद प्राप्त होतो. 

नऊ दिवस घरात माता दुर्गेच्या नावाचा दिवा लावावा. या दिवसांत आईच्या नवर्ण मंत्राचा अधिकाधिक जप करणे चांगले आहे. याशिवाय दुर्गा सप्तशतीचे पठणही या दिवसात चांगले फळ देते.

माता दुर्गेच्या पूजेमध्ये लाल रंगाचे आसन वापरावे. पूजा आटोपल्यानंतर हे आसन गुंडाळून नमस्कार करून सुरक्षित ठिकाणी ठेवावे. 

Chaitra Navratri 2023 Upay
Feng Shui Tips: फेंगशुई वास्तुशास्त्रानुसार 'ही' नाणी बदलेल तुमचे भाग्य

मातेच्या पूजेच्या वेळी लाल वस्त्र परिधान करणे शुभ असते. यासोबतच कपाळावर लाल रंगाचा टिका लावावा. लाल वस्त्र परिधान केल्याने माता राणीचा आशीर्वाद लवकर प्राप्त होतो.

सकाळी माता दुर्गाला मध मिसळून दूध (Milk) अर्पण करावे. माता आईला प्रसन्न करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. 

नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी घरात (Home) ठेवलेल्या वह्या, वाद्य, पेन इत्यादींचीही पूजा करावी. यामुळे माता दुर्गा तसेच माँ सरस्वतीचा आशीर्वाद मिळतो.

अष्टमी आणि नवमीच्या दिवशी हवन आणि कन्यापूजन अवश्य करावे. त्यांच्याशिवाय नवरात्रीची पूजा पूर्ण होत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com