Navratri Upay For Money: आज चैत्र नवरात्रीचा सहावा दिवस आहे. या दिवशी कात्यायनी मातेच्या सहाव्या रूपाची पूजा केली जाते. नवरात्रीच्या काळात माता देवीला प्रत्येक रूपाला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय केले जातात.
असे मानले जाते की नवरात्रीच्या दिवसांमध्ये केलेले छोटे बदल घरावर सकारात्मक परिणाम करतात. नवरात्रीमध्ये केलेल्या या उपायांमुळे माँ दुर्गासोबतच लक्ष्मीचा आशीर्वादही प्राप्त होतो. नवरात्रीमध्ये घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर काही काम केल्याने माता लक्ष्मीचे आगमन होते असे मानले जाते.
या वस्तू घराच्या मुख्य दारात ठेवल्यास होइल लाभ
घरात ठेवलेल्या झाडांना आणि वनस्पतींना विशेष महत्त्व आहे. सनातन धर्मात तुळशीचे रोप अत्यंत पवित्र मानले जाते. भगवान विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे. तुळशीला लक्ष्मीचे रूप देखील मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार (Vastu Tips) घराच्या मुख्य दरवाजासमोर तुळशीचे रोप लावल्याने घरातील आर्थिक समस्या कमी होतात.
आर्थिक स्थिती चांगली राहण्यासाठी घरात कोणत्याही प्रकारचे दोष नसावेत. जर तुमच्या घरात (Home) नकारात्मक ऊर्जा असेल किंवा तुम्हाला अनेकदा समस्यांनी घेरले असेल तर घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी उपाय करा. यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह लावावे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा तर येईलच शिवाय देवी लक्ष्मीचा आशीर्वादही प्राप्त होईल.
घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला शुभ चिन्ह लावल्याने घरातील सदस्यांना लाभ होतो. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि आर्थिक स्थितीही पूर्वीपेक्षा चांगली होते.
प्रत्येक शुभ कार्यात घराच्या मुख्य दरवाजावर तोरण बांधले जातो. सनातन धर्मात हे अत्यंत पवित्र मानले जाते. तोरण बांधणे घरामध्ये सौभाग्य आणतात असे मानले जाते. हे लावल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते. तोरणमध्ये आंब्याची किंवा अशोकाची पाने नेहमी वापरावी.
घराची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी भगवान शुक्राला प्रसन्न करणे आवश्यक आहे. घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला सुगंधी फुलांची भांडी लावा आणि त्यांना रोज पाणी द्या. असे केल्याने घरामध्ये धनाची देवी लक्ष्मीचे (Lord Lakshmi) आगमन होते.
घरामध्ये (Home) सकारात्मक उर्जेसाठी सूर्याची कृपा असणे आवश्यक आहे. नवरात्रीच्या काळात घराच्या मुख्य दारावर सूर्य यंत्र लावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. सूर्य यंत्राच्या प्रभावामुळे कुटुंबातील सदस्यांची आर्थिक प्रगती होते आणि घर धनधान्याने भरलेले असते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.