Car Care Tips: कारचा रंग नव्यासारखा ठेवण्यासाठी रबिंग करताय? जाणून घ्या फायदे अन् तोटे

जर तुम्ही कारची चमक कायम ठेवण्यासाठी जास्त घासत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
Car Color
Car ColorDainik Gomantak

Car Care Tips: अनेकदा कार जुनी झाल्यावर त्याची चनक कमी होते. अनेक लोक कारची चमक कायम राहण्यासाठी विविध उपाय करतात. यामध्ये काही लोक कारला रब करतात. कारच्या पेंटची चमक कायम ठेवण्यासाठी रबिंग फायदेशीर आहे की नुकसानकारक हे जाणून घेऊया.

चमक कमी होते


नवीन कारची चमक काही दिवसांनी कमी होते. धूळ, घाण, प्रदूषण इत्यादींमुळे गाडीचा रंग दीर्घकाळाने खराब होऊ लागतो आणि गाडीची चमक कमी होऊ लागते. त्यामुळे कधी कधी कार खूप जुनी दिसू लागते.

हा उपाय करतात

अनेकदा लोक आपल्या जुन्या कारच्या पेंटची चमक टिकवण्यासाठी अनेक लोक कारला नवीन दिसण्यासाठी पुन्हा पेंट करतात. असे करणे खूप महागात पडते. पण काही लोक गाडीवर रबिंग करतात.

काय फायदा होतो ?


त्यामुळे कारच्या पेंटची हरवलेली चमक परत मिळवता येईल. यासोबतच, रबिंगचा आणखी एक फायदा आहे की कारच्या पेंट पृष्ठभागावरील हलके ओरखडे देखील निघून जातात किंवा लक्षणीयरीत्या कमी होतात. जे सहज दिसू शकत नाहीत.

कोणते नकसान होते ?


कमी कालावधीत अनेक वेळा रब केल्याने कारमधून पेंट निघणे सुरू होऊ शकते. जे खूपच खराब दिसते. याशिवाय गाडी रब केल्यानंतर नीट धुतली नाही तर रबिंग क्रीम अनेक वेळा लावली जाते. ज्यामुळे गाडीचा रंग खराब होतो. त्यामुळे रब केल्यानंतर शॅम्पूने कार स्वच्छ धुवावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com