Car Care Tips: ड्रॅव्हिंग करताना करू नका 'या' 4 चुका, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान...

बहुतेक लोक कार चालवताना अशा काही चुका करतात. त्यामुळे कारचे नुकसान होण्याचा धोका वाढतो.
Car Care Tips
Car Care TipsDainik Gomantak

Car Care Tips: देशात कार चालवताना अनेकदा लोक नकळत अशा चुका करतात, त्यामुळे कारसंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. अशा कोणत्या चुका आहेत ज्यामुळे त्यामुळे कारला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

क्लचवर पाय ठेवणे

क्लचचा वापर फक्त गियर बदलण्यासाठी केला पाहिजे. पण बहुतेक लोक संपूर्ण प्रवासात डावा पाय क्लचवर ठेवतात. क्लचवर पाय ठेवल्याने वाहनाची क्लच असेंबली फारच कमी वेळात खराब होते आणि ती बदलणे महागात पडते.

गिअर लीव्हरवर हात ठेवणे

अनेकदा लोक मॅन्युअल ट्रान्समिशनसह कार चालवताना त्यांचा डावा हात गिअर लीव्हरवर ठेवतात. जेव्हा तुमचा हात त्यावर असतो तेव्हा त्याची हालचाल थांबते. त्यामुळे ते चालणारे भाग लवकर झिजायला लागतात. त्यामुळे जास्त वेळ असे करत राहिल्यास गाडीचा गिअर बॉक्स आणि इंजिनही खराब होते.

कार उभी असली तरी गिअरवर लक्ष द्या

प्रचंड ट्रॅफिक जॅममध्ये किंवा सिंगल लागल्यावर वेळी लोक आपली गाडी गिअरमध्ये ठेवतात असे अनेकदा पाहायला मिळते. आपण क्लचवर पाय ठेवून उभे राहतो. असे केल्याने क्लचचे बेअरिंग जे फक्त सुरळीत हलविण्यासाठी डिझाइन केलेले आहे, खराब होऊ लागते. म्हणूनच जेव्हाही तुम्ही जास्त वेळ कार उभी ठेवता तेव्हा गाडी न्यूट्रल ठेवा.

डोंगरावर कार चालवताना लक्षात ठेवा

अनेकदा लोक डोंगरावर गाडी चालवताना रोल बॅक टाळण्यासाठी क्लचचा वापर करतात. असे केल्याने तुम्ही पुन्हा एकदा महागड्या वाहनाच्या भागाचे आयुष्य कमी करता. तुम्ही गाडी चालवत असाल तर हँडब्रेकचा वापर करा आणि क्लच दाबू नका.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com