Cake Recipe: ख्रिसमस असो किंवा इतर कोणताही उत्सव असो, लोक अनेकदा बाजारातून केक आणतात. पण यंदा ख्रिसमसला घरीच स्वस्तात मस्त आणि टेस्टी केक तयार करू शकता. अनेक लोकांना असे वाटते की बिस्किट केक बनवणे हे एक कठीण काम आहे, परंतु प्रत्यक्षात तसे नाही. फक्त 10 मिनिटांत केक घरी बनवता येतो. यासाठी तुम्हाला बिस्किटे आणि काही छोट्या गोष्टी हव्या आहेत. फक्त 10 मिनिटांत बिस्किट केक कसा बनवायचा ते जाणून घेऊया.
बिस्किट केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य
बिस्किट - 2 मोठे पॅकेट
साखर - 2 चमचे
काजू - 6
दूध - 1 ग्लास
इनो - 1 टीस्पून
चॉकलेट
बिस्किट केक बनवण्याची कृती
बिस्किट केक बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही बिस्किट घेऊ शकता. बिस्किटांची 2 पॅकेट न उघडता रोलिंग पिनच्या मदतीने बारीक करावे. यानंतर तुटलेली बिस्किटे एका भांड्यात ठेवावी.
आता तुम्हाला 1 ग्लास दूध भांड्यात टाकावे लागेल आणि पिठात चांगले मिक्स करावे लागेल. पीठ चांगले तयार झाल्यावर त्यात साखर घालावी. बिस्किट आधीच गोड असल्याने तुम्ही जास्त साखर टाकू नका.
आता तुम्हाला पिठात इनो घालावे लागेल आणि चमच्याला 30 सेकंद गोलाकार गतीने फिरवून ते पिठात मिसळावे लागेल. आता पीठ झाकून 15 मिनिटे बाजूला ठेवा. आता एक भांड घ्या आणि त्यात हलके तेल किंवा बटर टाका आणि पिठात मिक्स करा.
तुम्हाला हवे असल्यास कुकरमध्ये किंवा ओव्हनमध्ये ठेवूनही शिजवू शकता. तुमचा केक 10 मिनिटांत तयार होईल. यानंतर केकवर चॉकलेट लावा आणि काजूने सजवा आणि सर्व्ह करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.