Business Idea: ट्रान्सपोर्ट बिझनेसमधून दर महिन्याला करा भरघोस कमाई , जाणून घ्या कसे?

जर तुम्ही बिझनेस करण्याचा विचार करत असाल तर मार्केटमध्ये असे अनेक बिझनेस आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही चांगली कमाई करू शकता.
Small Business Idea:
Small Business Idea:Dainik Gomantak
Published on
Updated on

Business Idea: जर तुम्हीही बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही ट्रान्सपोर्ट बिझनेसबद्दल नक्कीच विचार करु शकता. अगदी कमी पैशात तुम्ही शहरात किंवा गावात कुठेही सुरू करू शकता. तसे तर हा खूप जुना बिझनेस आहे, परंतु सध्याच्या काळात त्याची मागणी खूप वाढली आहे. गेल्या काही वर्षांपासून देशाची अर्थव्यवस्था तेजीत आहे. त्यामुळे ट्रान्सपोर्टच्या बिझनेसमध्येही वाढ झाली आहे.

सध्या ट्रान्सपोर्ट बिझनेस खूप प्रसिद्ध होत आहे. विशेषतः भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात त्याची मागणी नक्कीच वाढेल. तसेच भारतात अनेक पर्यटक भेट देण्यास येत असतात. यामुळे ट्रान्सपोर्टची मागणी वाढु शकते. तुम्ही ट्रान्सपोर्ट बिझनेससाठी कार, ट्रक यासारख्या गोष्टींचा वापर करु शकता.

जर तुमच्याकडे कार असेल तर तुम्ही तुमची कार ओला (OLA) किंवा उबर (Uber) सारख्या कंपन्यांशी जोडून हा व्यवसाय सुरू करू शकता. कारण आजकाल लोक कुठेही जाण्यासाठी ओला किंवा उबेर चा वापर करतात. ते त्यांना कमी वेळेत त्यांच्या स्थानापर्यंत पोहोचवतात.

Small Business Idea:
Anti-Aging Day Cream: घरीच बनवा एंटी-एजिंग डे क्रिम, दिवसभर चेहरा दिसेल ग्लोइंग

तुमच्याकडे कार नसली तरी तुम्ही हा बिझनेस करू शकता. तुम्ही कार भाड्याने घेऊन ती एखाद्या पर्यटन स्थळी किंवा शहरात चालवू शकता. यासाठी तुमच्याकडे गाडीचे लायसन्स आणि गाडीची सर्व कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे.

कोल्ड चेन सेवेचा बिझनेस हा जरा जास्त गुंतवणुकीचा बिझनेस आहे. पण यामध्ये कमाईही चांगली आहे. यामध्ये अशा मालाची वाहतूक केली जाते जे एका विशिष्ट तापमानात एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी नेले जातात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com