Breakup: ब्रेकअप के बाद..! नातं तुटल्यावर अशाप्रकारे त्यातून स्वत:ला सावरा; 'या' गोष्टी टाळा

ब्रेकअपनंतर सर्व प्रकारच्या जुन्या आठवणींपासून अंतर ठेवणे आवश्यक आहे
How To Recover From Break Up
How To Recover From Break Up Dainik Gomantak
Published on
Updated on

जेव्हा मुलगा आणि मुलगी प्रेमात पडतात तेव्हा ते खूप खुश असतात. लोक त्यांच्या जोडीदारांसोबत खूप प्रवास करतात, चित्रपटांसाठी योजना बनवतात,एकमेकांसोबत खूप छान वेळ घालवतात; पण अचानक कुठल्यातरी मोठ्या कारणामुळे दोघांना वेगळे व्हावे लागते. रिलेशनशिपमध्ये असताना फसवणूक करणे, एकमेकांकडे दुर्लक्ष करणे, आपले नाते गृहीत धरणे, एकमेकांना पुरेसा वेळ न देणे किंवा परस्पर समंजसपणाचा अभाव, बाँडिंग, अॅटॅचमेंट, केमिस्ट्रीचा अभाव इत्यादी कारणांमुळे ब्रेकअप होते.

अशा स्थितीत लोक खूप दुःखी होतात. ब्रेकअपमुळे अनेकजण डिप्रेशनमध्ये जातात. संपूर्ण जग त्यांना रिकामे वाटते. अनेकजण आतून तुटून जातात. अशा परिस्थितीत त्यांनी हे सर्व विसरून जीवनात पुढे जाणे अत्यंत आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशा टिप्स सांगणार आहोत, ज्या तुम्हाला ब्रेकअपमधून पुढे जाण्यास मदत करतील. (How To Recover From Break Up)

How To Recover From Break Up
Goa Fire: चिंचोणेत बागायतीला भीषण आग, आगीचे कारण अस्पष्ट

1. जुन्या आठवणींपासून अंतर ठेवा:

ब्रेकअपनंतर सर्व प्रकारच्या जुन्या आठवणींपासून अंतर ठेवणे आवश्यक आहे. आपण आपल्या भूतकाळाबद्दल विचार करणे थांबवले पाहिजे. सर्व चांगल्या आणि वाईट जुन्या आठवणी तुम्हाला नेहमीच तणावाने घेरू शकतात. यासाठी तुमच्या जुन्या नात्याशी संबंधित सर्व लहानसहान गोष्टींना निरोप द्या आणि पुढे जा. तुमच्या कामात लक्ष द्या.

2. मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवा:

ब्रेकअपनंतर विविध विचार मनात येतात. म्हणूनच ब्रेकअपनंतर एकटे राहणे टाळणे महत्त्वाचे आहे. ब्रेकअपनंतर तणावमुक्त राहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कुटुंब आणि जवळच्या मित्रांसोबत वेळ घालवणे. ब्रेकअपनंतर तुमचा विचार सकारात्मक ठेवा आणि तुमचे विचार कुटुंबासोबत शेअर करा. असे केल्याने तुम्हाला बरे वाटू शकते.

3. मजेदार टीव्ही शो पहा:

काही लोक ब्रेकअपनंतर खाणे पिणे बंद करतात. अशी चूक करू नका. यामुळे तुम्ही शारीरिकदृष्ट्या कमकुवत व्हाल. ब्रेकअपनंतर आयुष्यात पुढे जायचे असेल तर पौष्टिक खा, चांगल्या गोष्टींचा विचार करा. मन सेट करण्यासाठी तुमचे आवडते काम करा. छंद जोपासा. मजेदार टीव्ही शो पहा. यामुळे तुमचा मूड हलका होईल.

4. तुमचे विचार शेअर करा:

बहुतेक लोक ब्रेकअपनंतर तणाव आणि नैराश्याच्या स्थितीत जातात, कारण त्यांना एकटे वाटते आणि ते त्यांचे विचार कोणाशीही शेअर करू शकत नाहीत. पण ब्रेकअपनंतर तणावमुक्त राहण्यासाठी तुमच्या भावना शेअर करणे फार महत्वाचे आहे. म्हणूनच तुमच्या मनात जे काही असेल ते तुमच्या मित्र आणि जवळच्या लोकांसोबत शेअर करा.

5. योग किंवा व्यायाम करा:

ब्रेकअपमुळे व्यक्ती मानसिकदृष्ट्या कमकुवत होते तसेच थकते. अशा परिस्थितीत मानसिक तणाव दूर करण्यासाठी योग आणि ध्यान हे अतिशय प्रभावी मार्ग आहेत. ब्रेकअपनंतर टेन्शनमध्ये बसण्याऐवजी योगा आणि व्यायामाने तुम्ही स्वत:ला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com