Brain Tumor Awareness Month: ब्रेन ट्यूमरचे प्रकार अन् लक्षण कोणती? वाचा एका क्लिकवर

Brain Tumor: ब्रेन ट्यूमरची लक्षणे वेळीच समजली नाहीत तर ते तुमच्यासाठी जीवघेणा ठरू शकते.
Brain Tumor Awareness Month
Brain Tumor Awareness MonthDainik Gomantak
Published on
Updated on

Brain Tumor Awareness Month read symptoms types and treatment

जगभरात ब्रेन ट्यूमरच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. ब्रेन ट्यूमरची लक्षणे वेळीच समजली नाहीत तर ते तुमच्यासाठी जीवघेणा ठरू शकते. हा आजार लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच होऊ शकतो. बरेच लोक ब्रेन ट्यूमरची लक्षणे सामान्य मानण्याची चूक करतात आणि ही परिस्थिती आणखी बिकट होते. ब्रेन ट्यूमर का आणि कसा होतो? ब्रेन ट्यूमर टाळण्याचे उपाय कोणते आहेत हे जाणून घेऊया.

ब्रेन ट्यूमर म्हणजे काय?

ब्रेन ट्यूमर आणि ब्रेन कॅन्सर म्हणजे काय? मेंदूतील असामान्य पेशींच्या समूहाला ब्रेन ट्यूमर म्हणतात. अशा स्थितीत मेंदूच्या कोणत्याही भागामध्ये असामान्य पेशी असू शकतात. ब्रेन ट्यूमर कर्करोगजन्य किंवा कर्करोग नसलेले दोन्ही असू शकतात.

काही गाठी खूप वेगाने वाढतात, तर काही गाठी हळूहळू वाढतात. जेव्हा ट्यूमर वाढतो तेव्हा टाळूच्या आत दाब वाढू शकतो. तुमच्या आरोग्याला आणि मेंदूला हानी पोहोचवतात आणि प्राणघातक ठरू शकतात.

ब्रेन ट्यूमर विरूद्ध ब्रेन कॅन्सर याप्रमाणे समजून घ्या, जेव्हा ब्रेन ट्यूमर तुमच्या मेंदूमध्ये सुरू होतो आणि पसरतो तेव्हा त्याला प्राथमिक ब्रेन ट्यूमर म्हणतात. प्रत्येक ब्रेन ट्यूमर हा ब्रेन कॅन्सर असेलच असे नाही. पण जेव्हा कॅन्सर तुमच्या शरीराच्या दुसऱ्या भागात सुरू होतो आणि मेंदूमध्ये पसरतो तेव्हा त्याला दुय्यम ब्रेन ट्यूमर किंवा मेटास्टॅटिक ब्रेन कॅन्सर म्हणतात.

ब्रेन ट्यूमरवर उपचार कोणते?

ब्रेन ट्यूमर लवकर लक्षात आल्यास त्यावर उपचार शक्य आहे. परंतु ते वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. जसे- ट्यूमरचा प्रकार काय आहे, तो मेंदूमध्ये कुठे आहे, ट्यूमरचा आकार इ. ब्रेन ट्यूमरच्या उपचारासाठी तुमच्यासाठी कोणता उपचार योग्य आहे हे डॉक्टर ठरवतात.

ब्रेन ट्यूमर टाळण्याचे उपचार कोणते

रेडिएशन थेरपी

रेडिएशन थेरपीमध्ये ट्यूमर पेशी नष्ट करण्यासाठी उच्च ऊर्जा वापरली जाते. ही थेरपी तुम्हाला शरीराबाहेरून दिली जाऊ शकते. काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये ही थेरपी शरीरात तुमच्या ट्यूमरजवळ ठेवली जाऊ शकते.

सर्जरी

मेंदूतील गाठ अशा ठिकाणी असेल जिथून ती काढणे सोपे असेल, तर सर्जरी करून काढून टाकण्याचा प्रयत्न करतात.

केमोथेरपी

या केमोथेरपीमध्ये ट्यूमर पेशी नष्ट करण्यासाठी औषधे गोळीच्या स्वरूपात किंवा रक्तवाहिन्यांमध्ये इंजेक्शनद्वारे दिली जाऊ शकतात. यामध्ये अनेक प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. कर्करोगाच्या आकारानुसार आणि प्रकारानुसार दिली जातात.

ब्रेन ट्यूमरची लक्षणे

वारंवार डोकेदुखी होणे

हळूहळू डोकेदुखी वाढणे

धूसर दृष्टी

सीजर होणे

दूरदृष्टी कमजोर होणे

स्मरणशक्ती कमी होणे

झोपेचा अभाव

आळस आणि थकवा जाणवणे

विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता कमी होते

मळमळ आणि उलटी

व्यक्तिमत्वात बदल

ब्रेन ट्यूमर कशामुळे होतो?

रेडिएशनचे दुष्परिणाम

जर तुम्ही वारंवार रेडिएशनच्या संपर्कात येत असाल तर ब्रेन ट्यूमरचा धोका वाढू शकतो. कर्करोगाच्या उपचारादरम्यान तुम्हाला या रेडिएशनचा सामना करावा लागू शकतो. यामुळे ब्रेन ट्यूमरचा धोका वाढू शकतो.

कौटुंबिक इतिहास

जर कुटुंबातील इतर कोणाला आधीच ब्रेन ट्यूमर असेल, तर तो दुसऱ्या व्यक्तीला होण्याची शक्यता वाढते.

एचआयव्ही/एड्स

तुम्हाला एचआयव्ही-एड्स असल्यास तुम्हाला मेंदूतील ट्यूमर होण्याची शक्यता सामान्य लोकांपेक्षा जास्त असते.

आधीच कर्करोग असणे

कर्करोगाने ग्रस्त मुलांना पुढील आयुष्यात ब्रेन ट्यूमर होण्याची शक्यता असते. तसेच, ल्युकेमिया असणा-या प्रौढांना देखील याची शक्यता जास्त असते.

ब्रेन ट्यूमरचे दोन प्रकार

कर्करोगग्रस्त ब्रेन ट्यूमर

मेंदुचा कर्करोग कसा होतो हे तुम्हाला माहिती आहे का? कॅन्सरग्रस्त ब्रेन ट्यूमर हे मेंदूचे प्राथमिक ट्यूमर म्हणून ओळखले जातात. ही गाठ मेंदूपासून सुरू होते आणि हळूहळू शरीराच्या इतर भागात पसरते. उपचारानंतरही ते परत येण्याची शक्यता असते.

कर्करोग नसलेला ब्रेन ट्यूमर

या प्रकारची गाठ हळूहळू विकसित होते. कॅन्सर नसलेल्या ट्यूमरवर एकदा उपचार केल्यावर त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता कमी असते.

ब्रेन ट्यूमवर होमिओपॅथिक उपचार कोणते?

ब्रेन ट्युमवर होमिओपॅथिक उपचार करू शकतो. यामध्ये व्यक्तीच्या शरीरावर कमीतकमी दुष्परिणाम होऊन योग्यरित्या उपचार केले जातात. या उपचाराने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि शरीराला रोगांच्या लक्षणांना सामोरे जाण्याची ताकद मिळते.

होमिओपॅथिक औषधांचा ब्रेन ट्यूमरवर चांगला परिणाम होत असल्याचे पुरावे यूकेमध्ये केलेल्या एका संशोधनात मिळाले आहेत. होमिओपॅथिक औषधांचा डोस वाढवून ट्यूमरची वाढ रोखता येते. होमिओपॅथिक औषधांमध्ये असलेल्या सक्रिय रेणूंमुळेही रुग्णाला दुष्परिणाम होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.

भारतात ब्रेन ट्यूमर उपचारावर किती खर्च होतो?

भारतात ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रियेची किंमत ब्रेन ट्यूमरचा प्रकार, आकार, शस्त्रक्रियेचा प्रकार, उपचार पद्धती, सुविधा आणि विविध शहरांवर अवलंबून असते. ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रियेसाठी सरासरी 2,50,000 रुपये ते 7,50,000 रु. दरम्यान खर्च येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com