Bike Garba in Gujarat: बुलेट, तलवार अन् गरबा! गरब्यावेळी महिलेची बुलेटवर तलवारबाजी, पाहा व्हिडिओ

नवरात्रीचा उत्साह देशभरात पाहायला मिळत आहे. अनेक व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.
Bike Garba in Gujarat
Bike Garba in GujaratDainik Gomantak
Published on
Updated on

Bike Garba in Gujarat:  देशभरात शारदीय नवरात्री मोठ्या उत्साह साजरी केली जात आहे. या नऊ दिवसांमध्ये लोक माता दुर्गेच्या नऊ विविध रूपाची मनोभावे पुजा करतात. तसेच नऊ दिवस गरब्याचेही आयोजन केले जाते. गुजरात गरबासाठी सर्वाधिक प्रसिद्ध आहे. गरबा करतांना लोक दांडिया, टाळ्या यासारख्या अनेक गोष्टींचा वापर करतात. पण अलिकडेच एक असा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये महिला अशा स्टाईलने गरबा केला की लोक ते पाहून थक्कच झाले. हा व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने ट्विट करत सोशल मिडियावर शेअर केला आहे.

गुजरातमधील राजकोटमधून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महिला हातात तलवार घेऊन बाइक आणि कारवर 'गरबा' करताना दिसत आहेत. तलवार चालवणे ही गुजरातची एक पारंपारिक संस्कृती आहे. पारंपारिक 'राजपुताना' पोशाख परिधान करून महिलांनी दुर्गा देवीच्या सन्मानार्थ 'तलवार रास' सादर केला. तसेच या व्हिडिओमध्ये महिलांचा एक ग्रुप दुचाकीवरून येतो. यामध्ये एक महिला दुचाकी चालवते आणि दुसरी महिला मागच्या सीटवर उभी राहून आपली तलवार हवेत फिरवताना दिसत आहे. यावेळी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीही उपस्थित होते.

सुरतमध्ये नवरात्रीच्या तीसऱ्या दिवशी मोठ्या संख्येने गरबा खेळण्यासाठी लोक जमले होते. तसेच गांधीनगरमद्येही गरब्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. याचा व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने X (ट्विटर) वर शेअर केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com