Hanuman Ji: मंगळवारी चुकूनही 'हे' काम करू नका

हनुमान भक्त या दिवशी उपवास आणि पूजा करून संकटमोचनाचे आशीर्वाद प्राप्त करतात.
Hanuman
HanumanDainik Gomantak
Published on
Updated on

आज मंगळवार आहे. पंचांगानुसार आज आषाढ मासातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी असून ती सायंकाळी 7.30 पर्यंत राहील. आज पूर्वा फाल्गुनी नक्षत्र उरले आहे. आज मंगळ ग्रह मेष राशीत बसला आहे आणि चंद्राचे संक्रमण सिंह राशीत होत आहे. या दिवशी हनुमानजींची पूजा करण्याचा विशेष योग आहे. या दिवशी हनुमानजींचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवने गरजेचे आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा मंगळ अशुभ असतो तेव्हा हनुमानजीची पूजा करणे शुभ मानले जाते. हनुमानजींची पूजा केल्याने मंगळ दोष दूर होते असे मानले जाते.

* या गोष्टी चुकूनही करू नका
मंगळवार हा दिवस हनुमानजींना (Hanumanji) समर्पित आहे. या दिवशी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. हनुमानजींना स्वच्छता जास्त आवडते. त्यामुळे या दिवशी स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. मंगळवारी शिस्तबद्ध जीवनशैली अंगीकारावी आणि या गोष्टी कराव्यात-

Hanuman
Monsoon Skin Care Tips: पावसाळ्यात हा फेसपॅक लावा, मिळवा चिकट त्वचेपासून मुक्ती

* कोणाचाही अपमान करू नका
मंगळवारी तुमच्या पदाचा आणि सत्तेचा कधीही गैरवापर करू नये. इतरांचा अपमान करणे टाळावे. विशेषत: अशा व्यक्तीचा अजिबात अपमान करू नये, जो दुर्बल आहे. अशा लोकांशी गैरवर्तन करणाऱ्यांना हनुमानजी कठोर शिक्षा देतात.

* वाईट सवयींपासून दूर राहा
मंगळवारी सर्व प्रकारच्या वाईट सवयींपासून दूर राहून हनुमानजींचे स्मरण करावे. या दिवशी मादक पदार्थ घेऊ नयेत. मांस देखील सेवन करू नये. यासोबतच तुम्ही ज्या पलंगावर झोपता त्यावर बसून जेवन करू नये. असे केल्याने हनुमानजींची कृपा प्राप्त होत नाही असे मानले जाते.

* बोलण्यात गोड आणि स्वभाव नम्र ठेवा
मंगळवारी बोलण्यात अपशब्द बोलु नये. सर्वांशी गोड बोलले पाहिजे. स्वभावात नम्रता ठेवा. सर्वांवर प्रेम करा आणि हनुमानजींची विधिपूर्वक पूजा करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com