7 Tips For Skin Care after 40 Years of age: जसजसे आपले वय वाढच जाते तसतसे आपल्या त्वचेत कोलेजनचे उत्पादन कमी होणे, हार्मोन्समध्ये बदल असे अनेक बदल होतात. याशिवाय सूर्यप्रकाश आणि प्रदूषणाचा प्रभाव त्वचेवर होतो. यामुळे वृद्धत्वाचे प्रमाण वाढु शकते.
याच्या चाळीशीनंतर त्वचेची काळजी घेणे अधिक गांभीर्याने पाळले जाणे आवश्यक आहे.अनेकांना पिंपल्सची समस्या असते. तुमचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त असल्यास, तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यासाठी तुम्ही काही खास स्किनकेअर टिप्सचा वापर करु शकता.
वयाच्या 40 व्या वर्षी अशी घ्यावी त्वचेची काळजी
त्वचा नेहमी स्वच्छ ठेवावी
कोणत्याही स्किनकेअर रुटिनमध्ये त्वचा (Skin) स्वच्छ ठेवण्यावर भर दिला जोतो. यासाठी तुमच्या त्वचेचे नैसर्गिक तेल टिकवून ठेवणारे क्लिंजर वापरणे गरजेचे आहे. क्लीन्सर निवडताना नेहमी लक्षात ठेवा की त्यात हायलुरोनिक अॅसिड आणि ग्लिसरीन आहे. जेणेकरून तुमची त्वचा मऊ आणि मॉइश्चराइज राहील.
अँटी-एजिंग प्रोडक्टस
तुमच्या वयाच्या 40 व्या वर्षी सुरकुत्या आणि काळे डाग येत असेल तर अँटी-एजिंग प्रोडक्टचा वापर करावा. पण ही बाब लक्षात ठेवा की त्यामध्ये रेटिनॉल, व्हिटॅमिन सी किंवा पेप्टाइड्ससारख्या काही आवश्यक गोष्टी असतात. या सर्व गोष्टी वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्यास मदत करतात.
सनस्क्रीनचा वापर करावा
सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी सनस्क्रीचा वापर करावा. जेणेकरून आपली त्वचा निरील. सनस्क्रीन घेताना लक्षात ठेवा की ते SPF 30 किंवा त्याहून अधिक असावे. घराबाहेर पडताना सनस्क्रीनचा वापर करावा, पण घरी असलात तरी त्याचा वापर करा. घरात राहून तुम्ही कमी एसपीएफ सनस्क्रीन वापरू शकता.
हायड्रेट स्किन
वयानुसार तुमची त्वचा पातळ होते आणि आर्द्रता कमी होते. यामुळे त्वचा ड्राय आणि निस्तेज होते. या समस्येसाठी आपली त्वचा आतून आणि बाहेरून हायड्रेट करणे महत्वाचे आहे. दिवसभर भरपूर पाणी प्यावे आणि हायड्रेटिंग स्किनकेअर उत्पादने तुमच्या दिनचर्येत समाविष्ट करावा.
डोळ्यांची काळजी घ्यावी
डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा खूप मऊ असते. वृद्धत्वाची चिन्हे डोळ्यांभोवती प्रथम दिसतात. जसे की बारीक रेषा आणि सुरकुत्या पडतात. डोळ्यांखाली हायड्रेटिंग आय क्रीम किंवा सीरम लावून वृद्धत्वाची प्रक्रिया मंद करता येते.
पुरेशी झोप
निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. अपुऱ्या झोपेमुळे डोळ्याभोवती काळी वर्तुळे, सूज येऊ शकते. रोज 7-9 तास झोप घेतल्याने त्वचा निरोगी राहते.
सकस आहार
निरोगी, संतुलित आहार घेतल्याने तुमच्या त्वचेच्या आरोग्यावर आणि स्वरूपावर लक्षणीय परिणाम होतो. तुमच्या शरीराला आणि त्वचेला आवश्यक पोषक द्रव्ये देण्यासाठी भरपूर फळे आणि भाज्या, संपूर्ण धान्य आणि पातळ प्रथिने खा. प्रक्रिया केलेले पदार्थ, साखरयुक्त पेये आणि जास्त मीठ किंवा अल्कोहोलचे सेवन टाळा, हे सर्व जळजळ आणि कोलेजनच्या विघटनास कारणीभूत ठरू शकतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.