Face Bleach Effect: महिलांनो तुम्हीही वारंवार पार्लरमध्ये ब्लीच करता? त्याने चेहरा तर उजळेल, पण होतील हे तोटे...

काही लोकांच्या त्वचेवर ब्लीचिंगमुळे अनेक प्रकारचे दुष्परिणाम दिसून येतात.
Best Face Bleach | Face Bleach Side Effects
Best Face Bleach | Face Bleach Side Effects Dainik Gomantak
Published on
Updated on

Best Face Bleach: चेहऱ्यावरील नको असलेले केस ब्लीच करण्यासाठी, त्वचेचा काळसर भाग लपवण्यासाठी अनेकदा महिला ब्युटी पार्लरमध्ये जातात.

यामुळे चेहराही स्वच्छ होतो आणि केसांचा रंगही सोनेरी होतो, ज्यामुळे तुमची त्वचा सुंदर आणि स्वच्छ दिसते.

पण, तुम्हाला माहीत आहे का की वारंवार चेहऱ्यावर ब्लीचिंग करणे देखील त्वचेच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते? काही लोकांच्या त्वचेवर ब्लीचिंगमुळे अनेक प्रकारचे दुष्परिणाम दिसून येतात. ब्लीचिंगचे इतर तोटे काय असू शकतात ते जाणून घेऊया.

Best Face Bleach | Face Bleach Side Effects
Watermelon Juice Benefits: मधुमेहाच्या रुग्णांनी कलिंगड खावे की नाही? डॉक्टरांच्या मते...

ब्लीचिंगचे तोटे

तज्ञांच्या मते, अनेक वेळा ब्लीचमध्ये काही घटक आणि रसायने असतात जी त्वचेला सहन होत नाहीत. त्यामुळे त्यांचा जास्त वापर त्वचेला हानी पोहोचवू शकतो.

ज्यांची त्वचा जास्त संवेदनशील आहे, त्यांनी फक्त चांगल्या दर्जाचे ब्लीच प्रोडक्ट विकत घ्यावे किंवा पार्लरमध्ये वापरायला सांगावे.

अभ्यासानुसार, ब्लीचिंग उत्पादनांच्या वापरामुळे त्वचारोग होऊ शकतो. यामध्ये त्वचेचा लालसरपणा, फोड, त्वचेवर व्रण, कोरडी त्वचा, सूज, खाज, जळजळ इत्यादी समस्या असू शकतात.

अनेक वेळा ब्लीचिंग केल्यामुळे काही लोकांमध्ये नेफ्रोटिक सिंड्रोमची समस्या उद्भवते. हा एक प्रकारचा किडनीशी संबंधित विकार आहे. त्यामुळे किडनीच्या रक्तवाहिन्या खराब होऊ शकतात.

कचरा आणि अतिरिक्त पाणी फिल्टर करण्यासाठी मूत्रपिंड जबाबदार आहे. नेफ्रोटिक सिंड्रोममुळे तुमचे शरीर लघवीत जास्त प्रमाणात प्रथिने उत्सर्जित करते. त्यामुळे डोळ्यांभोवती सूज येणे, घोट्यांजवळ सूज येऊ शकते.

ब्लीच केव्हा करावे

ब्लीचिंगमुळे त्वचेचे तसेच एकूण आरोग्याचे नुकसान होऊ शकते. अशा स्थितीत महिन्यातून एकदाच ब्लीच करणे गरजेचे आहे, जर गरज वाटत नसेल तर ब्लिचिंग टाळणेच चांगले.

जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुमच्या चेहऱ्यावर केसांचे छोटे तुकडे जास्त दिसू लागले आहेत, त्वचेवर काळे डाग पडले आहेत, पिंपल्समुळे डाग वाढले आहेत, तेव्हाच चांगल्या ब्युटी पार्लरमध्ये जाऊन ब्लीच करून घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com