Vastu Tips: मोराची पिसे घरात ठेवल्यास मिळेल आर्थिक लाभ, 'हे' नियम ठेवा लक्षात

Vastu Tips: मोराची पिसे घरात ठेवल्यास मिळेल आर्थिक लाभ, 'हे' नियम ठेवा लक्षात
Published on
Updated on

धर्मग्रंथात भगवान श्रीकृष्णाने मोराचे पिस धारण केल्याचे सांगितले आहे. याशिवाय हिंदू धर्मानुसार, सरस्वती, लक्ष्मी, इंद्रदेव आणि भगवान कार्तिकेय यांनाही मोराची पिसे खूप प्रिय आहेत. मोराची पिसे केवळ घराचे सौंदर्यच वाढवत नाही तर, त्याचे अनेक फायदे देखील शास्त्रात सांगण्यात आले आहेत. (Peacock Feather Benefits)

वास्तुशास्त्रात मोराच्या पिसांचा संबंध सुख, समृद्धी आणि संपत्तीशी जोडला जातो. असे मानले जाते की घरात मोराची पिसे ठेवल्याने अनेक वास्तू दोष दूर होतात. पण, यासंबंधीचे काही महत्वाचे नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

Vastu Tips: मोराची पिसे घरात ठेवल्यास मिळेल आर्थिक लाभ, 'हे' नियम ठेवा लक्षात
Monkeypox: कोरोनानंतर आता मंकीपॉक्स विषाणूने लोकांच्या चिंतेत भर

कोणत्या दिशेला ठेवावी मोराची पिसे

कोणत्याही शुभ प्रसंगी, जेव्हा तुम्ही घरी मोराचे पिसे घरी घेऊन याल तेव्हा ते घराच्या दक्षिण-पूर्व दिशेला ठेवा. ही दिशा मोराची पिसे ठेवण्यासाठी उत्तम मानली जाते. असे केल्याने घरामध्ये आर्थिक समस्या असल्यास ती दूर होईल. यासोबतच कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीचे इतर मार्गही खुले होतील.

कुंडलीत राहु दोष असेल तर मोराची पिसे जवळ ठेवा

वास्तू तज्ञांचे असे मत आहे की जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहु दोष असेल तर त्याने आपल्या सोबत मोराची पिसे ठेवली पाहिजेत. मोराच्या पिसामुळे अनेक प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेचा प्रसार कमी होतो आणि घरात ठेवल्याने ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते.

लॉकरमध्ये ठेवा मोराची पिसे

लॉकरमध्ये मोराची पिसे ठेवल्याने संपत्ती वाढते असे वास्तू तज्ञ सांगतात. यासोबतच आर्थिक संकटातूनही सुटका मिळते.

Vastu Tips: मोराची पिसे घरात ठेवल्यास मिळेल आर्थिक लाभ, 'हे' नियम ठेवा लक्षात
Kartik Aaryan: गणेश चतुर्थीला 'लालबागच्या राजा'च्या दर्शनासाठी पोहोचला कार्तिक आर्यन

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com