Coconut Water Benefits : उन्हाळ्यात नारळ पाणी पिल्याने शरीराला होतात हे फायदे; एकदा वाचाच

: उन्हाळ्यात शरीरात थंडावा टिकवून ठेवण्यासाठी आपण आपल्या आहारात अनेक प्रकारच्या गोष्टींचा समावेश करतो.
Coconut Water Benefits
Coconut Water BenefitsDainik Gomantak
Published on
Updated on

Coconut Water Benefits : उन्हाळ्यात शरीरात थंडावा टिकवून ठेवण्यासाठी आपण आपल्या आहारात अनेक प्रकारच्या गोष्टींचा समावेश करतो. नारळपाणीही त्यापैकीच एक. रस्त्याच्या कडेला नारळपाण्याच्या गाड्यांमधून तुम्ही त्याचा आस्वाद घेतला असेल. नारळाचे पाणी केवळ शरीरात थंडावा आणत नाही तर ते एक उत्तम ऊर्जा बूस्टर देखील आहे. यासोबतच नारळाच्या पाण्याचे सेवन रक्तातील साखर नियंत्रित करण्यासह किडनी स्टोकचा धोका कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकतो. नारळपाणी प्यायल्याने त्वचेत चमकही येते.

नारळाचे पाणी इलेक्ट्रोलाइट्स आणि पोषक तत्वांचा नैसर्गिक स्रोत आहे आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. चला जाणून घेऊया उन्हाळ्यात नारळ पाणी पिण्याचे आरोग्य फायदे.

Coconut Water Benefits
Second Hand Smartphone खरेदी करायचा विचार करताय? चुकूनही करु नका हे काम

नारळ पाणी पिण्याचे 5 मोठे फायदे

  • रक्तातील साखर नियंत्रित राहते

मधुमेहाच्या रुग्णांना उन्हाळ्यात साखरेऐवजी नारळपाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. नारळपाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहून मधुमेहात आराम मिळतो. मात्र नारळाच्या पाण्यात नैसर्गिक साखर असल्यामुळे जास्त प्रमाणात नारळ खाल्ल्याने मधुमेही रुग्णांना हानी पोहोचते.

  • किडनी स्टोन

नारळाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने तुमच्या किडनीचे आरोग्य चांगले राहते. 2018 मध्ये केलेल्या अभ्यासानुसार, ज्या लोकांना किडनी स्टोन नाही त्यांना नारळाचे पाणी दिले गेले, त्यानंतर असे निदर्शनास आले की, दगड बाहेर काढण्यासाठी किंवा तयार होण्यापासून रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

  • हृदयाचे आरोग्य

नारळ पाणी हृदयाच्या आरोग्यास देखील फायदेशीर आहे. यामध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब कमी करण्यास मदत करते. अभ्यासात असे आढळून आले आहे की नारळाच्या पाण्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

  • त्वचेचे आरोग्य

संपूर्ण आरोग्यासाठी नारळपाणी खूप फायदेशीर आहे. शरीराला डिटॉक्स करण्यासोबतच त्वचेची चमक वाढवण्यासही हे उपयुक्त आहे. नारळाचे पाणी प्यायल्याने किंवा त्वचेवर लावल्याने मॉइश्चरायझरसारखा प्रभाव पडतो. नारळाचे पाणी नियमितपणे पिणे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.

  • तणाव नियंत्रण

नारळाच्या पाण्यात पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. पोषक तत्वांसह, त्यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म देखील आहेत जे ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि मुक्त रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com