Benefits Of Carrot Juice in Winter
Benefits Of Carrot Juice in WinterDainik Gomantak

Benefits Of Carrot : हिवाळ्यात आहारात गाजराचा करा समावेश; होतात हे फायदे

गाजराचा रस तुमची प्रतिकारशक्ती वाढवेल आणि पोटाच्या समस्यांपासून तुम्हाला आराम देईल.
Published on

आरोग्य हा जगातील सर्वात मोठा खजिना आहे असे म्हणतात, जर तुमचे आरोग्य चांगले नसेल तर सर्वात मोठी संपत्ती देखील तुमच्या कामाची नाही. थंडीच्या मोसमात सामान्यतः लोकांना पोटाच्या समस्या जास्त होतात. थंडीत शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि आपण मौसमी आजारांना बळी पडतो. थंडीच्या काळात गाजऱ्याच्या रसाचा आहारात समावेश केल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होईल आणि पोटाशी संबंधित समस्याही दूर होतील. (Benefits Of Carrot Juice in Winter)

Benefits Of Carrot Juice in Winter
Women Health : सावधान! महिलांमध्ये या आजाराच्या प्रमाणात वाढ
  • गाजराचा रस रोज प्या

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गाजराचा रस तुमची प्रतिकारशक्ती वाढवेल आणि पोटाच्या समस्यांपासून तुम्हाला आराम देईल. गाजर हे असे फळ आहे ज्यामध्ये कॅलरीज कमी प्रमाणात आढळतात. याच्या सेवनामुळे पोटाची पचनक्रिया सुरळीत राहते आणि शरीरात अनावश्यक चरबी जमा होत नाही, त्यामुळे शरीरातील लठ्ठपणाही कमी होतो.

गाजराचा रस शरीरातील चयापचय दर सुधारण्यास मदत करतो. याचे सेवन केल्याने अपचन, बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीची समस्या दूर होते. गाजराच्या रसात लिंबू आणि काळी मिरी पावडर मिसळून प्यायल्यास आणखी फायदा होतो.

  • त्वचेवर चमक आणते

थंडीच्या मोसमात त्वचेची चमक कुठेतरी नाहीशी होते. गाजराचा रस त्वचेची चमक परत आणण्यास मदत करतो. गाजरामध्ये असलेले व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या दृष्टीसाठी फायदेशीर आहे. जेवणाच्या आधी मुख्य करून गाजर खावे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com