Lifestyle News: थंड पाण्याने अंघोळ करणे जास्त फायदेशीर की गरम पाण्याने? जाणून घ्या सविस्तर

दररोज आंघोळ करणे केवळ शरीराच्या स्वच्छतेसाठी आवश्यक नाही तर दररोज योग्य पद्धतीने आंघोळ केल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
Bath
Bath Dainik Gomantak
Published on
Updated on

बहुतेक लोक दररोज सकाळी आंघोळीने दिवसाची सुरुवात करतात. आंघोळ हा आपल्या दैनंदिन दिनचर्येचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आंघोळ केवळ शरीराच्या स्वच्छतेसाठी आवश्यक नाही तर दररोज योग्य पद्धतीने आंघोळ केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. व्यग्र दिनचर्या आणि दैनंदिन कामांनंतर, शरीरावर साचलेले बॅक्टेरिया काढून टाकण्यासाठी आणि शरीराचा थकवा कमी करण्यासाठी आंघोळ आवश्यक आहे.

(Benefits of Bathing with Hot and Cold Water)

Bath
Protein Hair Oil: प्रोटीन हेअर ऑइल केसांसाठी ठरते फायदेशीर

गरम पाण्याने आंघोळ करणे म्हणजे घरीच स्पा करण्यासारखे आहे, गरम पाण्याने आंघोळ केल्यावर शरीराला आराम मिळतो आणि शरीराचा थकवा निघून जातो. दुसरीकडे, थंड पाण्याने आंघोळ केल्यावर आळस संपतो आणि तुम्हाला उत्साही वाटते. चला जाणून घेऊया, गरम आणि थंड पाण्याने आंघोळ तुमच्यासाठी कशी फायदेशीर ठरू शकते.

गरम पाण्याच्या आंघोळीचे फायदे

schlhealth.org आणि तज्ञांच्या मते, रात्री कोमट पाण्याने अंघोळ केल्याने चांगली झोप येण्यास मदत होते. दिवसभर काम केल्यामुळे शरीर थकून जाते, त्यामुळे झोप येत नाही, अशा स्थितीत झोपण्यापूर्वी गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीराला आराम मिळतो आणि तुम्हाला चांगली झोप येते.

Bath
Diwali Festival 2022: सूर्यग्रहणामुळे गोंधळ वाढला! जाणून घ्या दिवाळीची नेमकी तारीख

त्वचा सुखावते: गरम पाण्याने आंघोळ केल्यावर वाफेमुळे त्वचेची छिद्रे उघडतात, त्यामुळे त्वचेतील घाण बाहेर पडते आणि तुमची त्वचा स्वच्छ आणि निरोगी राहते. कोमट पाण्याने अंघोळ केल्याने आपल्या त्वचेची काळजी घेण्यास आणि चांगले दिसण्यास मदत होते.

थंड पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे

केस चमकदार आणि त्वचा मऊ बनवते: थंड पाणी तुमच्या छिद्रांना घट्ट करते. थंड पाण्याने आंघोळ केल्याने केसांमधील नैसर्गिक तेल टिकून राहते आणि केस चमकदार दिसतात. थंड पाण्याने अंघोळ केल्याने तुमची त्वचा हायड्रेट होण्यासही मदत होते.

रक्त प्रवाह चांगला: थंड पाण्याने अंघोळ केल्याने संपूर्ण शरीरात रक्त प्रवाह वाढतो, त्यामुळे थंड शॉवरमधून बाहेर पडल्यानंतरही रक्त परिसंचरण सुधारते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com