Beetroot Pickle: तुमच्या घरात आणि माझ्या घरात जेवणासोबत लोणचे मोठ्या आवडीत खाल्ले जाते. जेवण चांगले बनवलेले असो वा खराब, लोणच्याचा आहारात समावेश केला तर जेवणाची चव द्विगुणित होते. भारतीय घरांमध्ये पराठा किंवा साध्या जेवणासोबत चविष्ट लोणचे देण्याची प्रथा मानली जाते. हिवाळ्यात जेवणासोबत लोणचे खाणे अनेकांना आवडते. अनेकांना कैरीचे लोणचे तर काहींना मिरचीचे लोणचे आवडते. हिवाळ्यात तुम्ही बीट एकदा नाही तर अनेक वेळा खात असाल. तुम्ही बीटपासून लोंच देखील तयार करू शकता. हे बनवणे अगदी सोपे आहे. चला तर मग जाणून घऊया रेसिपी.
बीट लोंच बनवण्यासाठी लागणारे साहित्य
बीट - 500 ग्रॅम
लसूण पाकळ्या - 5-6
कढीपत्ता - 5
आले - 1/2 तुकडे
हिरवी मिरची - 4 बारीक चिरून
हळद - 1/2 टीस्पून
लाल-काश्मिरी पावडर - 1/2 टीस्पून
मेथी दाणे - 1/2 टीस्पून
व्हिनेगर - 1 चमचा
हिंग - 1/2 टीस्पून
आमचुर पावडर - 2 चमचे
मोहरीचे तेल - 1/2 कप
आचारी मसाला - 2 चमचे
मोहरी - 2 चमचे
चवीनुसार मीठ
बीट लोंण बनवण्याची कृती
बीटचे लोंणचे बनवणे खूप सोपे आहे. यासाठी सर्वात पहिले बीट सोलून त्याचे छोटे तुकडे करावे.
तुमच्या गरजेनुसार बीट कापल्यानंतर किमान 1 दिवस उन्हात ठेवावे. ऊन नसल्यास बीट 2-3 दिवस सुकविण्यासाठी ठेवावे. यामुळे लोणच्याची टेस्ट योग्य होईल.
कढईत मोहरीचे तेल घालून गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, लसूण, आले, मिरची, कढीपत्ता, हळद-तिखट घालून 10-15 मिनिटे चांगले परतून घ्या.
15 मिनिटानंतर सर्व बीटचे तुकडे पॅनमध्ये टाकावे आणि सुमारे 10 मिनिटे चांगले तळून घ्या. यानंतर पॅनमध्ये मीठ, आमचुर वापडर, लोंणच मसाला, मेथीदाण्याची पूड घालून चांगले मिक्स करून झाकण ठेवून 10 मिनिटे शिजवा.
दुसर्या पॅनमध्ये 1/2 कप मोहरीचे तेल घालून गरम करा आणि थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवावे.
यानंतर, बीट व्यवस्थित तळून घ्या आणि थोडा वेळ थंड होऊ द्या. थोडा वेळ थंड झाल्यावर लोंणचे हवा बंद भरणीत टाका. आता त्यात गरम केलेले तेल घालून चांगले मिसळा आणि थोडा वेळ उन्हात ठेवा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.