चेहऱ्यांवरील (Face) सौंदर्य (Beauty) टिकून राहण्यासाठी महिला अनेक ब्युटी प्रॉडक्ट (Beauty products) वापरतात. परंतु मेकअप (Makeup) काढल्यानंतर चेहरा कोरडा, (Dry) निस्तेज (Dingy) दिसतो. मेकअप (Makeup) न करता देखील आपण सुंदर दिसू शकतो. जाणून घेऊया काही खास टिप्स. या टिप्स फॉलो केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक ठिकून राहण्यास मदत मिळते.
* मेडिटेशन करावे
नियमियतपणे सकाळी आणि संध्याकाळी 20 ते 30 मिनिटे मेडिटेशन करावे. यामुळे तत्वचेला योग्य प्रमाणात ऑक्सीजन मिळते. मेडिटेशन करणे आरोग्यास लाभदायी असते. आपले मन आणि डोक शांत राहते. यामुळे त्वचेचे नैसर्गिकरित्या सौंदर्य वाढून मेकअपची गरज पडत नाही.
* व्यायाम करावे
नियमितपणे व्यायाम केल्याने आपले आरोग्य निरोगी राहते. यामुळे शरीरातील रक्तभिसरण प्रक्रिया सुरळीत काम करते. तज्ञांच्या मते, आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास आणि चेहऱ्यावरील नैसर्गिक सौंदर्य टिकून राहण्यास मदत मिळते.
* झोपण्यापूर्वी चेहरा धुवावा
अनेक महिला झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करणे टाळतात. पण चेहऱ्यावरची साचलेल्या घाणीमुळे त्वचेचे छिद्रे बंद होतात. यामुळे त्वचेला ऑक्सीजनचा पुरवठा होत नाही. यामुळे चेहऱ्यावर डाग पडणे, सुरकुत्या येणे, यासरख्या त्वचेच्या समस्या निर्माण होतात. ही समस्या टाळण्यासाठी नेहमी मेकअप रिमूव्हर किंवा गुलाबजलचा वापर करावा. झोपण्यापूर्वी फेसवॉश केल्याने चेहरा स्वच्छ होवून नैसर्गिक सौंदर्य ठिकून राहण्यास मदत मिळते.
* सकस आणि निरोगी आहार
सकस आणि निरोगी आहार घेतल्याने आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. आहारात पोषक घटक आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. यामुळे तुमचे नैसर्गिक सौंदर्य टिकून राहते. बाहेरील मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाणे टाळावे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.