Ayurvedic Tips: बदलत्या हवामानाबोरोबर आपण आपल्या खाण्याच्या सवयी देखील बदलल्या पाहिजेत. थंडी वाढू लागली आहे आणि लोकांची रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होऊ लागली आहे. यामुळे जेव्हा ऑक्टोबर महिन्यात गुलाबी थंडी पडायला लागते तेव्हा आयुर्वेदानुसार कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा हे जाणून घेऊया.
आयुर्वेदानुसार थंडीच्या सुरूवातीला काही नियमांचे पालन केल्यास कोणतेही आझर होणार नाही.
तुप
हिवाळ्यात तुप खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. तुमच्या आहारात तूप आणि खोबरेल तेलाचा समावेश करावा.
दालचिनी
या हिवाळ्यात चहा बनवताना त्यात 1/4 तुकडा दालचिनी घालावा. यामध्ये डिमुलसेंट नावाचा पदार्थ असतो. यामुळे कफचा त्रास कमी होतो.
मसाल्यांचा वापर
मीठ, आलं, विलायची, दालचिनी, लवंगा, काळे मिरी, लसूण, कांदा आणि ओरेगॅनो यांसारख्या मसाल्यांचा मध्यम प्रमाणात वापर केल्यास जड पदार्थ पचण्यास मदत होते.
पदार्थ गरम करून खावे
तुम्ही जर सॅलेड खात असाल तर आता गरम सूप प्यायला सुरूवात करावे. अंडी, तूप, दूध, भाज्या, नट आणि बिया इत्यादि शरीरात संरक्षणात्मक, इन्सुलेट चरबीचा थर तयार करण्यास मदत करतात.
काळे मिरे
काळे मिरे चहामध्ये टाकून प्यायल्यास सर्दी आणि पचन सुलभ होते. तुम्ही तुमच्या सकाळच्या चहामध्ये दालचिनीचे मिश्रण देखील करू शकता. काळे मिरे, हळद आणि दालचिनी या दिवसांमध्ये खाणे फायदेशीर असते.
हळदीचे दुध
हळदीचे दुध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. रात्री झोपतांना हळदीचे दुध प्यायल्यास हाडांचे आरोग्य निरोगी राहते.
जायफळ
या दिवसांमध्ये शांत झोप येण्यासाठी एक ग्लास कोमट दुधात चिमूटभर जायफळ टाकावे. यामुळे निद्रानाश दूर होईल आणि वातची समस्या दूर होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.