Don't make these mistakes if you have a money plant in your home
Don't make these mistakes if you have a money plant in your homeDainik Gomantak

मनी प्लांट घरात असेल तर या चुका टाळा,अन्यथा होईल आर्थिक नुकसान

विशेषत: आर्थिक स्थिती (Financial) सुधारण्यासाठी घरात मनी प्लांट (Money Plant) असणे शुभ मानले जाते.
Published on

वास्तुशास्त्रात(Vastushatrat), घराच्या सुख आणि समृद्धीसाठी झाडे आणि वनस्पति लावण्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. विशेषत: आर्थिक स्थिती (Financial status) सुधारण्यासाठी घरात मनी प्लांट (Money Plant) असणे शुभ मानले जाते. पण मनी प्लांट (Money Plant) घरात योग्य दिशेने आणि योग्य पद्धतीने लावल्यास घरात पैसे (Money) टिकून राहतात. वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट (Money Plant) घरात लावण्याचा फायदा होण्यासाठी पूढील टिप्स (Tips) फॉलो करणे गरजेचे आहे.

Dainik Gomantak

* रंग आणि आकाराकडे लक्ष द्या

मनी प्लांट हे संपत्तीचे प्रतीक मानले जाते, म्हणून मनी प्लांट लावताना विशेष काळजी घ्यावी. मनी प्लांटचा रंग जितका हिरवा असेल तितकी तुमची आर्थिक स्थिति चांगली राहते. मनी प्लांट खरेदी करतांना हृदयाच्या आकाराची पाने असलेली घ्यावी. अशा मनी प्लांटस संपत्ती, समृद्धी आकर्षित करतात आणि त्याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.

* घरातच मनी प्लांट लावावे

जर तुम्ही मनी प्लांट घरात लावल्यास चांगली वाढ होते. मनी प्लांट अतिसूर्यकिरनांपासून दूर ठेवावे. मनी प्लांट हिरव्या रंगाच्या भांड्यात किंवा निळ्या रंगाच्या बाटलीत ठेवावे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

Don't make these mistakes if you have a money plant in your home
Vastu Tips: घरातील भितींना शुभ रंग दिल्याने सुख-समृद्धी लाभते

* योग्य दिशा निवडा

मनी प्लांट कधीही पूर्व - पश्चिम दिशेला ठेवू नये. कारण यामुळे घरात समस्या निर्माण होतात. वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट नेहमी घरच्या दक्षिण-पूर्व दिशेने कोपऱ्यात ठेवावे. मनी प्लांट या दिशेने ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा कमी होऊन आर्थिक परिस्थिति सुधारण्यास मदत मिळते.

* मनी प्लांट सुकू देवू नका

वास्तुशास्त्रानुसार घरात कधीच कोमजलेले मनी प्लांट ठेवू नका. कारण त्याचा आर्थिक परिस्थितीवर होतो. यासाठी नियमित त्यात पाणी घालत राहावे. मनी प्लांटची पाने कधीच जमिनीला टेकले नाही पाहिजे. जर त्याची काही पाने कोमेजलेले असेल तर कापून घ्यावी.

* मोठ्या भांड्यात मनी प्लांट लावा

मनी प्लांट नेहमी मोठ्या फुलदाणी किंवा भांड्यात लावावे. कारण मनी प्लांटची वाढ ही अधिक होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com