Eating Frozen Foods: तुम्हीही फ्रोझन फूड खाताय? वेळीच व्हा सावध, अन्यथा 'या' आजारांना पडाल बळी

Tips for Eating Frozen Foods: आजकाल धावपळीमुळे अनेक लोक फ्रोझन फुडला जास्त प्राधान्य देतात. कारण यामुळे वेळेची बचत होते. पण असे पदार्थ खाणे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत हे जाणून घेऊया.
Tips for Eating Frozen Foods
Tips for Eating Frozen FoodsDainik Gomantak
Published on
Updated on

Tips for Eating Frozen Foods: आजकालच्या धापवळीच्या जीवनात फ्रोझन आणि रेडी टु इट फूडचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. आपल्या धावपळीच्या जीवनमानामुळे लोकांनी घरचे ताजे पदार्थ खाण्याऐवजी मार्केटमधुन तयार फ्रोझन फूड खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. 

फ्रोझन फूडची मागणी वाढल्याने मार्केटमध्ये त्यांची उपलब्धताही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रोटीपासून भाज्या आणि चिकनपर्यंत ते फ्रोझन फूड म्हणून उपलब्ध आहेत. हायड्रोजनेटेड पाम तेल फ्रोझन अन्नात वापरले जाते. 

ज्यामध्ये हानिकारक ट्रान्स फॅट्स असतात. याशिवाय या पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाणही खूप जास्त असल्याचे आढळून येते. ज्यामुळे आपले शरीर पोकळ होते. त्यामुळे अनेक आजार निर्माण होऊ शकतात.

कर्करोगाचा धोका

संशोधनात असे दिसून आले आहे की जास्त काळ फ्रोझन अन्न खाल्ल्याने कर्करोगाचा धोका वाढतो. फ्रोझन मांस रोज खाल्ल्याने पोटाचा कर्करोग म्हणजेच स्वादुपिंडाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.

फ्रोझनअन्न खाल्ल्याने शरीरातील नायट्रोजनचे प्रमाण वाढते ज्यामुळे कर्करोग होतो. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म कमी असतात.

मधुमेह

फ्रोझन पदार्थांची चव आणि ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी , त्यात स्टार्चचे प्रमाण जास्त असते. जेव्हा आपण गोठवलेले अन्न खातो तेव्हा या स्टार्चचे शरीरातील ग्लुकोजमध्ये रूपांतर होते.

या ग्लुकोजच्या अतिरेकीमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते, ज्यामुळे मधुमेहासारख्या आजारांचा धोका खूप वाढतो. 

हृदयविकाराचा धोका

फ्रोझन फूडमध्ये ट्रान्स फॅटचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. ट्रान्स फॅट शरीरातील खराब कोलेस्टेरॉल वाढवते आणि चांगले कोलेस्ट्रॉल कमी करते.

खराब कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयविकार होतात. रक्तवाहिन्यांमध्ये रक्तसंचय होऊ लागते आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. 

वजन वाढते

फ्रोझन फूडमध्ये कॅलरी आणि फॅट जास्त असते, ज्यामुळे वजन वाढते. फ्रोझन फूड खाल्ल्यानंतर लवकर भूक लागते आणि त्यामुळे जास्त कॅलरीज लागतात. त्यामुळे लठ्ठपणा आणि वजन झपाट्याने वाढते. 

पोटाचे आजार

फ्रोझन पदार्थ खाल्ल्याने पोटासंबंधित आजार निर्माण होऊ शकतात. यामुळे तुम्हाला जर न्रोगी राहायचे असेल तर आहारात पोषक पदार्थांचा समावेश करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com