Slipper Astro Tips: एक चप्पल बदलू शकते तुमचे भाग्य; जाणून घ्या ज्योतिषशास्त्र काय सांगते

Slipper Astro Tips: एक चप्पल बदलू शकते तुमचे भाग्य; जाणून घ्या ज्योतिषशास्त्र काय सांगते
Published on
Updated on

ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचा घरातील प्रत्येकावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडत असतो. त्याचमुळे घरातील प्रत्येक गोष्टी बाबत ज्योतिषशास्त्रात माहिती देण्यात आली आहे. पायातील चप्पलबाबत देखील ज्योतिषशास्त्रात माहिती देण्यात आलीय, त्याचा वापर करून आपण आपले भाग्य सुधारू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत चप्पल बाबतच्या काही महत्वाच्या गोष्टी.

चप्पलशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याकडे तुम्ही लक्ष दिले तर तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते. म्हणजेच चप्पल देखील तुम्हाला श्रीमंत बनवू शकते. तसेच, याकडे दुर्लक्ष केल्यास घरात गरिबी पोहोचायला वेळ लागत नाही.

Slipper Astro Tips: एक चप्पल बदलू शकते तुमचे भाग्य; जाणून घ्या ज्योतिषशास्त्र काय सांगते
Long Covid Symptoms: सावधान! या पदार्थांमुळे वाढू शकतात लाँग कोविडची लक्षणे

अनेकजण घरात तुटलेली किंवा जुनी चप्पल ठेवतात. पण तुटलेली चप्पल घरात अशांतता निर्माण करते. घरातील तुटलेली चप्पल ताबडतोब काढून टाकण्याचा प्रयत्न करा.

चप्पल कधीही घराच्या उंबरठ्यावर ठेवू नये. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहत नाही असे म्हणतात.

शूज किंवा चप्पल घालून कधीही जेवण करू नका. यामुळे नशीबात अडथळे निर्माण होतात. नेहमी अनवाणी पायांनी स्वयंपाकघरात प्रवेश करा.

शनिवारी बूट आणि चप्पल दान करणे खूप शुभ मानले जाते. विशेषत: शनिवारी संध्याकाळी चामड्याचे बूट आणि चप्पल दान केल्याने शनिदेवाची कृपा होते.

Slipper Astro Tips: एक चप्पल बदलू शकते तुमचे भाग्य; जाणून घ्या ज्योतिषशास्त्र काय सांगते
Astro Tips: दातांवरून कळते, तुमच्या आयुष्यात पैशांची तंगी असेल की नाही!

दुसऱ्या व्यक्तीची चप्पल स्वतः कधीही घालू नका. असे केल्याने तुमच्या घरी गरिबी येऊ शकता. असं म्हणतात की तुम्ही कोणाची चप्पल घातली तर ॉ कोणाचा तरी संघर्ष तुमच्या वाट्याला येतो.

ज्योतिष शास्त्रानुसार सोमवार आणि शुक्रवारी नवीन शूज आणि चप्पल घालणे शुभ मानले जाते. हे आपले नशीब उजळविण्यासाठी मदत करते.

(Disclaimer: वरील माहितीची आम्ही कोणत्याही प्रकारे पुष्टी करत नाही.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com