Astro Tips: दररोज पितळीच्या भांड्यामध्ये जेवण केल्यास मिळेल आयुष्यात यश

जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात काही समस्यांचा सामना करावा लागत असेल तर पितळीच्या भांड्यांमध्ये जेवण करणे फायदेशीर ठरू शकते.
Astro Tips:
Astro Tips: Dainik Gomantak
Published on
Updated on

astro tips benefits of eating food bronze utensils

ज्योतिषशास्त्राच्या आधारे अनेक धातू अत्यंत पवित्र मानले जातात. त्यांचा संबंध कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी असल्याचेही सांगितले जाते. या धातूंपौकी एक पितळ आहे. हे बुध ग्रहाशी संबंधित असल्याचे दिसून येते.

तुम्ही पितळ धातूचे दागिने घालू शकता आणि त्यात जेवण देखील करू शकता. यामुळे तुम्हाला जीवनात अनेक फायदे होतील. परंतु तुमच्यावर सर्वात जास्त परिणाम करणारी गोष्ट म्हणजे तुमच्या कुंडलीतील बुधाची स्थिती सुधारेल. जर तुम्ही रोज पितळीच्या भांड्यात जेवण केल्ल्यास तुमचे आयुष्य बदलू शकते.

कोणत्याही आजार झाल्यास

जर तुम्हाला अनेक दिवसांपासून कोणत्याही आजाराने ग्रासले असेल किंवा अचानक असा आजार झाला असेल ज्याच्या उपचारांना बराच वेळ लागणार असेल तर या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही पितळीच्या भांड्यात जेवण करू शकता.

कामे अयशस्वी होत असेल तर

कामाच्या ठिकाणी तुम्ही इच्छा नसतानाही सर्व चुकीच्या गोष्टी करत असाल आणि त्यामुळे तुमचे करिअर बिघडत असेल, तर समजा तुमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. हे देखील बुध कमजोर होण्याचे लक्षण आहे. अशावेळी तुम्ही पितळेच्या भांड्यांमध्ये जेवण केले पाहिजे.

तुमच्या सवयी बिघडू शकतात

जर बुध कमजोर असेल तर तुम्हाला वाद घालण्याची सवय लागण्याची शक्यता आहे. यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते आणि सुरू असलेले काम बिघडू शकते. तुम्हाला खोटं बोलण्याचीही सवय असू शकते. हे टाळण्यासाठी रोज पितळीच्या भांड्यातील पाणी प्यावे. शक्य असल्यास सकाळी उठल्याबरोबर हे काम करा. कोणाच्याही बनावट भांड्यातील पाणी कधीही पिऊ नका. यामुळे तुमचे नुकसानही होऊ शकते.

आर्थिक नुकसान होत असेल तर

जर बुध ग्रह कमजोर असेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला कुठेतरी पैशाची कमतरता जाणवू लागेल. तुम्ही पैसे कमावण्याच्या संधी गमावू लागाल आणि तुम्ही पैसे गमावाल. अशावेळी जर तुम्ही पितळीच्या भांड्यात पंडिताला भोजन दिले तर तुम्हाला फायदा होईल. तुमची बुद्धिमत्ता तीक्ष्ण असेल आणि तुम्हाला पैसे वाचवण्याच्या आणि कमावण्याच्या संधी मिळतील. तसेच पैशाची कमतरता भासणार नाही आणि आर्थिक स्थिती सुधारेल.

नातेसंबंध बिघडू शकतात

जर तुमचा बुध कमजोर असेल तर त्याचा तुमच्या नातेसंबंधांवरही परिणाम होईल. विशेषत: तुम्ही तुमच्या घरातील वडिलधाऱ्यांना योग्य तो आदर देऊ शकणार नाही. इतकंच नाही तर तुमच्या जोडीदारासोबतचं तुमचं नातंही काही खास नसेल आणि तुमच्यात भांडणं होत राहतील. यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एकाच पितळीच्या ताटात जेवण केले पाहिजे. यामुळे तुमच्या परस्पर संबंधात गोडवा वाढेल.

त्वचेसाठी फायदेशीर

जर चेहऱ्यावर विपरित परिणाम दिसत असील किंवा केस गळत असेल तर तुमच्या कुंडलीतील बुध कमजोर आहे. अशावेळी बुध ग्रहाला बळ देण्यासाठी पितळीच्या भांड्यांमध्ये जेवण केले पाहिजे.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com